निसर्गाच्या कुशीत वसलेल्या श्री पोवारडेबाजी देवस्थानाचे तांबिटकरवाडीतील युवकांनी घेतले दर्शन
जंगलातून जाताना घेतला रानमेव्याचा आस्वाद
चिपळूण : तालुक्यातील बामणोली पूर्वतांबेवाडी येथील तांबिटकर भावकीतील युवक आणि युवती यांनी निसर्ग रम्य ठिकाणी बसलेल्या शिवकालीन पोवारडेबाजी मंदिरात जाऊन देवदर्शन घेतले. यावेळी त्यांनी जंगलातून जाताना रानमेव्याचा आनंद ही घेतला.
बामणोली येथे दाट जंगलात शिवकालीन पोवारडेबाजी देवस्थान वसलेले आहे. हे स्वयंभू देवस्थान आहे. या ठिकाणी नवतरुण मित्र मंडळाने पोवारडेबाजीचे मंदिर बांधले आहे. अनेक भाविक येथे दर्शनासाठी जात असतात.
मुंबईतून गावी आलेले तांबिटकरवाडीतील सर्व युवकांनी आणि महिलांनी विचारा केला की, आपण लांब प्रवास करून देवदर्शनासाठी जातो. मग आपल्याच गावात रानात वसलेले पोवारडेबाजीचे मंदिर आहे. ते अजून आपण पाहिले नाही. मग मोठ्या देवस्थानाला जाऊन काय उपयोग.. असा सजग विचार त्यांनी केला. याच भावकीतील सचिन तांबिटकर यांनी या देवस्थानाबाबत माहिती सांगितली.
पूर्वी मे महिना संपल्यावर जर लवकर पाऊस पडला नाही तर गावातील सर्व लोक या पोवारडेबाजी मंदिरात पायी दिंडी घेऊन जात असत. त्यानंतर पाऊस हा पडायचा. असे आजही जुनी जाणते लोक सांगतात. अशा महान देवस्थानाला तांबिटकर वाडीतील युवक युवती यांनी भेट देत. दर्शन घेतले. देवाच्या चरणी श्रीफळ अर्पण करून भाव भक्तीने श्रद्धेचा नमस्कार केला. यावेळी सचिन तांबिटकर यांनी सांगितले की, मंदिरात गेल्यावर आम्हाला खूप प्रसन्न वाटले. तेथील वातावरण मनाला भावले. रानात वसलेले हे मंदिर म्हणजे निसर्ग सौंदर्याचा खजिना आहे. यावेळी सर्वांनी जंगलातून जाताना आंबे, करवंद, अशा रानमेव्याचा आस्वाद घेतला.


Comments
Post a Comment