वहाळ येथील व्यापारी व ग्रामस्थांनी सावर्डे महावितरण कार्यालयाला दिली धडक
दोन दिवसात वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी उपोषणाला बसणार
चिपळूण : तालुक्यातील वहाळ बाजारपेठमधील व्यवसायिकांनी सावर्डे महावितरण कंपनीवर धडक देत सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने व्यापारी आणि ग्रामस्थ हैराण झाले आहेत. त्यामुळे त्यांनी सावर्डे उपविभाग येथील महावितरण कार्यालयावर धडक देत उपकार्यकारी अभियंता अनिल खोडे यांना मागील निवेदनाचे स्मरण पत्र देत वीजपुरवठा दोन दिवसांत सुरळीत न झाल्यास १५ ऑगस्ट २०२६ रोजी उपोषणाला बसणार असा इशारा दिला आहे.
वरील निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, दि. ९ जुलै रोजी वहाळ विभागामध्ये सतत वीज खंडीत होत असल्याचे सावर्डे येथील महावितरण अधिकारी यांना निवेदन देऊन सांगण्यात आले होते. परंतू काही दिवस वीज पुरवठा सुरळीत होता. त्यानंतर पुन्हा वीज पुरवठा खंडित झाला आहे. परिणामी या समस्येमुळे वहाळ बाजारपेठेतील व्यावसायिक हैराण झाले आहेत. ९ जुलै रोजी दिलेल्या निवेदना नंतर व्यापारी आणि ग्रामस्थ यांनी पुन्हा उपकार्यकारी अभियंता महावितरण सावर्डे यांना स्मरण पत्र दिले आहे.
विजेचा खेळखंडोबा होत असल्याने विद्यार्थी यांना सुध्दा अभ्यास करताना समस्या निर्माण होत आहे. या निवेदनाद्वारे पून्हा एकदा ग्रामस्थानी विनंती केली आहे की लवकरच गणपती सण येत आहे. तेव्हा वीज पुरवठा खंडित होता कामा नये.
तरी वीज पुरवठा येत्या दोन दिवसात सुरळीत व्हावा अन्यया दि. १५ ऑगस्ट रोजी वहाळ बाजारपेठेतील व्यापारी वर्ग उपोषणाला बसतील असा इशारा त्यांनी सावर्डे महावितरण कार्यालय अधिकारी यांना दिला आहे.
हे निवेदन देताना अमोल कोदारे, प्रकाश शिरकर, धनंजय सावंत,समिर भागडे, सोमा सुवरे,सिद्धांत सावंत, मंगेश दाभोळकर, शेख सर , महादेव मांडवकर, नरेंद्र पालकर,सागर कुंभार आदी उपस्थित होते.

Comments
Post a Comment