बोरगाव मोरेवाडी येथे सरस्वती मोरे कबड्डी चषकावर चौथ्यांदा अनिकेत स्पोर्ट्स क्लब खेड संघाने नाव कोरले
स्वराज्य स्पोर्टस क्लब चिपळूण संघ उपविजेता
स्वराज्य स्पोर्टस क्लब चिपळूण संघ उपविजेता
चिपळूण : तालुक्यातील शिवबा मित्र मंडळ बोरगाव मोरेवाडी आयोजित आणि रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोशियन व चिपळूण तालुका कबड्डी असोशियन यांच्या संयुक्त विद्यमानाने सरस्वती मोरे चषक २०२६ जिल्हा स्तरीय महिला कबड्डी स्पर्धेवर अनिकेत स्पोर्ट्स क्लब संघ खेड या संघाने सलग चौथ्यांदा आपले नाव कोरले आहे. स्पर्धेत स्वराज स्पोर्ट्स चिपळूण संघ उपविजेता ठरला.
स्पर्धेचे उद्घाटन शनिवार १८ रोजी झाले त्यानंतर रविवार १९ रोजी स्पर्धेतील अंतिम सामना खेळवण्यात आला. सरस्वती मोरे कबड्डी चषक २०२६ या महिला कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सेमीफायनल खेळविण्यात आली. त्यामध्ये अनिकेत स्पोर्ट्स क्लब संघ खेड विरुद्ध संघर्ष क्रीडा स्पोर्टस दापोली असा सामना रंगला. मात्र, खेड संघाने हा सामना एकतर्फी जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. सेमीफायनलचा दुसरा सामना स्वराज्य स्पोर्टस क्लब चिपळूण आणि चिपळूण स्पोर्टस अकॅडमी यांच्यात चुरशीचा सामना रंगला. मात्र, अखेर स्वराज्य स्पोर्टस क्लब चिपळूण या संघाने अंतिम फेरी प्रवेश केला.
शिवबा मित्र मंडळ बोरगाव मोरेवाडी यांनी आयोजित केलेल्या महिला कबड्डी स्पर्धेचा अंतिम सामना अनिकेत स्पोर्ट्स क्लब खेड भरणे विरुद्ध स्वराज्य स्पोर्टस क्लब चिपळूण यांच्यामध्ये रंगला. यात खेड भरणे संघाने स्वराज्य चिपळूण संघावर मात करत अखेर सरस्वती मोरे कबड्डी चषकावर चौथ्यांदा नाव कोरले. सर्व क्रीडा रसिकांनी टाळ्यांच्या कडकडात खेळाडूंचे स्वागत केले.
स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेता संघ अनिकेत स्पोर्ट्स क्लब खेड या संघाला मान्यवर दीपक सावंत आणि इतर मान्यवरांच्या हस्ते चषक आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर द्वितीय विजेता संघ स्वराज्य स्पोर्टस क्लब चिपळूण संघाला मान्यवरांच्या हस्ते चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. यानंतर स्पर्धेतील उकृष्ट चढाई श्रेया हुंबरे, उकृष्ट पकड तस्मिन बुरंडकर आणि स्पर्धेतील उकृष्ट खेळाडू म्हणून प्रतीक्षा चव्हाण या पारितोषिक देण्यात आले.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमाला दीपक सावंत, भाजपा जिल्हा अध्यक्ष सतीश मोरे, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद निवळकर, सदस्या सौ रावी मोरे, पंचायत समिती सदस्या सुप्रिया वंजारे, पत्रकार ॲड संतोष कुळे, नितीन सावंत, संतोष हळदणकर, मनोहर पारकर, मोहन मोरे, आणि उत्तर मान्यवर उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवबा मित्र मंडळ बोरगाव मोरेवाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

Comments
Post a Comment