'वर्क फ्रॉम व्हिलेज'ने वेगाने आर्थिक विकास : ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर
चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने २५ व २६ एप्रिल रोजी शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात कोकण अभ्यासवर्ग विद्यार्थी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ‘पोखरण अनुचाचणी विषयावर धोरण : विचार – दिशा -आखणी’ याबाबत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांची मुलाखत घेतली. सुरवातीलाच डॉ. काकोडकर यांना अनुचाचणी घेण्यमागील कारण मिमांसा स्पष्ट केली. १९७४ आणि १९९८ मध्ये अनुचाचणी करताना आखलेले धोरण, बाळगलेली गोपनियता, संघटीतपणाने केलेले काम, टिम वर्क, बारकाईने केलेले नियोजन थोडक्यात सांगितले. प्रामुख्याने तरूणाईला उद्देशून म्हणाले, एखादे नवीन काम करताना समाजाचा पाठींबा मिळत नाही. आपण जे चांगले शिकलो त्यावर आपला विश्वास असायला हवा. दुसऱ्यांचाही विश्वास संपादन करण्याची गरज आहे. सर्वोत्तम घटक पुढे आणायचे असतील तर त्यास चाळण लावावीच लागेल. नवीन काम करणाऱ्यांना समाजाने प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. अन्वस्त्र सज्जतेसाठी भारताला जेवढी गरज आहे, तेवढा साठा आपल्याकडे असल्याचे सांगितले.
देशातील तरूणाई हे विकसीत भारताचे बलस्थान आहे. तरूणांनी आपले प्रश्न आपणच सोडवू हि मनसकिता बाळगावी. दुसऱ्याचे अनुकरण करून नंबर वन होऊ शकत नाही. स्वतःचा आत्मविश्वास असायला हवा. उर्जा निर्मीती ही कोळसा, पाणी, ऑईलवर अवलंबून राहिली. सोलार उर्जा कितीही विकसीत झाली तरी ती ही विकसीत भारताला पुरेशी पडणार नाही. क्वॉलिटी ऑफ लाईफ सुधारण्यासाठी चौपट उर्जा निर्माण करावी लागणार आहे. ही क्षमता केवळ न्युक्लिअर एनर्जी मध्येच आहे.
अन्वस्त्र, शस्त्र आणि तंत्रज्ञान याचा वापर कसा करतोय त्यावर चांगले वाईट अवलंबून आहे.देशात औद्योगिकरणामुळेच विकास होतो ही मानसिकता बनली आहे. ग्रामीण भागातील सुविधांच्या अभावामुळे सर्वजण शहराकडे धाव घेत आहेत. मात्र विकसीत भारतासाठी ग्रामीण भागाकडे लक्ष द्यायला हवे. ग्रामीण भागात गुणवत्ता ठासून भरली असून येथेच आधुनिक सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्यास देशाचा आर्थिक विकास दर वाढण्यात मदत होइल असा विश्वास डॉ. काकोडकर यांनी व्यक्त केला.

Comments
Post a Comment