खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व बैठक
आमदार शेखर निकम यांनी केले मार्गदर्शन
![]() |
चिपळूण : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व बैठक फोटो गॅलरी सभागृह,वनभवन, मार्कंडी चिपळूण येथे माननीय आमदार शेखर निकम सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
सदर बैठकीमध्ये कृषी विभागाच्या विविध योजना,मोहिमा, अभियान तसेच खते व बियाणे उपलब्धता बाबत सादरीकरण वर चर्चा करण्यात आली.त्याचबरोबर शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या ध्येयातून , कृषी यांत्रिकीकरण उप-अभियानांतर्गत (SMAM) दळवटणे गावचे शेतकरी रुपेश भुवड यांनी घेतलेल्या 'मळणी आणि भात लागवड,रोटाव्हेटर यंत्राचे' लोकार्पण आमदार शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात आले.
आमदार शेखर निकम यांनी या यंत्राची चावी रुपेश भुवड यांना सुपूर्द केली आणि त्यांचे अभिनंदन केले. यामुळे शेती कामात सुलभता येणार आहे.,असे मत व्यक्त केले.या सदर बैठकी प्रसंगी उपस्थित चिपळूण- संगमेश्वर विधानसभेचे आमदार शेखर निकम,चिपळूण पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत खेतले, प्रांताधिकारी आकाश लिगाडे,जिल्हा परिषद सदस्य सौ. पूजा शेखर निकम, सौ. रावी मोरे,सौ.नेहा रहाटे, पंचायत समिती सदस्य सौ.स्नेहा साळवी,सौ उज्वला घाग व आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Comments
Post a Comment