सत्यवान रेडकर यांचे २ व ३ मे रोजी खेड व चिपळूण मध्ये‌  शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन 


चिपळूण : कोकणातील जास्तीत जास्त विद्यार्थी शासनाच्या विभागात विविध पदांवर प्रशासकीय सेवेत यावेत यासाठी कोकणचे सुपुत्र सत्यवान यशवंत रेडकर, वरिष्ठ अनुवाद अधिकारी, केंद्रीय वस्तू तसेच सेवा कर, मुंबई, भारत सरकार हे पुढील वेळापत्रकाप्रमाणे २ मे ३ रोजी खेड व चिपळूण येथे निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणार आहेत. 

शनिवार, २ मे २०२६ सकाळी ११.०० वा., डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन, एल.पी.स्कूलच्या बाजूला, खेड एसटी स्टँड जवळ, ता. खेड, सायंकाळी ४.०० वा., नाभिक समाज सभागृह, खेर्डी, माळीवाडी,  चिपळूण येथे रविवार ३ मे २०२६ रोजी सकाळी ८.३० वा., ग्रामसेवक भवन, कापसाळ, ता.  चिपळूण व दुपारी ३.३० वा., श्री राधाकृष्ण मंदिर, खांदाट, गवळवाडी,  चिपळूण मोफत मार्गदर्शन करणार आहेत. 

जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. व्याख्यानासाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही, फक्त वही व  सोबत आणावे. कोणत्याही वैयक्तिक सबबी न देता कोकणातून जास्तीत जास्त अधिकारी घडवण्यासाठी स्वतः विद्यार्थ्यांसहित उपस्थित रहावे, अधिक माहितीसाठी  सत्यवान यशवंत रेडकर, मो. ९९६९६५७८२० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments