ग्रामीण भागातील शाळा वाचवण्यासाठी जन आंदोलनाची गरज
जिल्हा शिक्षण संस्था चालक संघाच्या बैठकीत निर्णय
चिपळूण : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा वाचवण्यासाठी, १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयाच्या विरोधात सर्वांनी एकसंघ होऊन पुढील दिशा ठरवण्यासाठी रत्नागिरी जिल्हा शिक्षण संस्था चालक संघाचे अध्यक्ष संजय शिर्के यांनी जिल्ह्यातील बाधित शाळांची एक बैठक बोलावली होती.
गुरुवार दि. २३ एप्रिल रोजी चिपळूण कोंढे, रिगल हॉल मध्ये संपन्न झालेल्या या सभेसाठी रत्नागिरी जिल्हा शिक्षण संस्था चालक संघाचे अध्यक्ष संजयराव शिर्के, सचिव सुभाष गुढेकर, सहसचिव मल्लेश लकेश्री, दोणवली गावच्या माजी सरपंच सुशीला पवार, परवेज डबीर, सारंग विद्यालय दापोलीचे शांताराम पवार, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ जालगाव, दापोलीचे भास्कर जायभाये, अजय महाडिक, मुख्याध्यापक राजेन्द्रकुमार ओंबासे, अश्रू अस्वले, यशवंत शिक्षण संस्था भोमचे प्रशांत शिर्के, नवरत्न शिक्षण संस्थेचे नरेंद्र करमरकर, कुरचुंडा संगमेश्वरचे मुख्याध्यापक शेख, त्याचबरोबर असंख्य संस्थांचे प्रतिनिधी, मुख्याध्यापक, ग्रामस्थ, पालक, शिक्षणप्रेमी उपस्थित होते.
यामध्ये ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी, संस्थाचालक, शिक्षणप्रेमी मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत. १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय रद्द करून या शाळांसाठी नवीन धोरणात्मक निर्णय जो पर्यंत होत नाही तोपर्यंत हा लढा सुरु राहणारच आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून अत्यंत नियोजनबद्ध हे जनआंदोलन राबवले जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण माध्यमिक शाळा वाचवण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा संस्थाचालक संघाचे अध्यक्ष संजय शिर्के यांनी केले आहे.
Comments
Post a Comment