"धनेश' च्या अस्तित्वासाठी वृक्ष संरक्षण अत्यावश्यक

जीआयटी' चे अधिष्ठाता डॉ. नितीन केळकर उत्पादन प्रतिपादन



खेड  : वाढती वृक्षतोड आणि शिकारी मूळ धनेशांचे अनेक प्रजाती आज धोक्यात आहेत. त्यांचे अस्तित्व टिकवण जमिनीचे संरक्षण करणे आणि मोठ्या वृक्षांचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाचेडॉ. नितीन केळकर यांनी केले. 

जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात  'हॉर्नबिल च्या माध्यमातून  निसर्ग संवर्धनाचा जागर करण्यात आला. निसर्ग आणि नैसर्गिक घटकांबद्दल आपुलकी आणि संवेदना  निर्माण करण्यासाठी 'धनेश' पक्ष्यांचे संवर्धन या विषयावर आयोजित व्याख्यान ते बोलत होते. ते म्हणाले, धनेश पक्षी मोठ्या फळे खाऊन लांब अंतरावर जात त्यांच्या विष्ठेद्वारे बियांचा प्रसार करतात. नैसर्गिक नैसर्गिक नवीन जंगले तयार होण्यास मदत होते. त्यांना 'जंगलाचा शेतकरी' म्हणतात. एखाद्या जंगलातील धनेश पक्ष्यांचे अस्तित्व अस्तित्वात आहे हे त्या जंगलाच्या उत्तम आरोग्याचे लक्षणही आहे. त्यांचा समावेश धनेश पक्षाच्याजननाची अनोखी पद्धती यावर  प्रकाश टाकला.

ओला सुका कचरा वर्गीकरण आणि पाण्याचा पुनर्वापर याबाबत विद्यार्थ्यांनी  पॉवर्नी पोस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून जनजागृती केली. याप्रसंगी महाविद्यालयाचे व्यवस्थापक डॉ. अनंत मराठे यांच्यासह  सर्व विभाग प्रमुख, शिक्षक शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. शाश्वत विकास कक्ष समिती डॉ. एस के पाटील यांनी आभार मानले.


चौकट

जीवनशैली व्हायला हवी

महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. प्रमोद यांनी मनोगत पृथ्वीचे संरक्षण करणे ही एका दिवसाची जबाबदारी   नसून ती आपली जीवनशैली  व्हायला हवी. हॉर्नबिल क्लब सारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे  वन्यजीव आणि निसर्गाप्रती आत्मीयता निर्माण करणे, असा विश्वास व्यक्त केला. सामान्यत महाविद्यालयात हॉर्न क्लब, मित्र मंडळ स्थापन करून त्याच्या  संवर्धनासाठी काम सुरू करण्याची शपथ घेण्यात आली .

Comments