जनगणनेत ओबीसी समाजाचा स्वतंत्र रकाना दाखवा..तरच माहिती देऊ..
ओबीसींनी आपल्या हक्क अधिकारांसाठी सजग रहा
चिपळूण ओबीसी संघर्ष समितीचे आवाहन
दिनांक १६ मे २०२६ पासून जनगणनेच्या पहिला टप्पा (घर नोंदणी) सुरू झाली आहे. यात आपली माहिती आहे. मात्र प्रश्नावलीत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमध्ये कुटुंब प्रमुखांची जात (प्रवर्ग) विचारली आहे. फक्त सामान्य वर्ग (ओपन) अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती असे तीन पर्याय जनगणनेच्या अर्जात देण्यात आले आहेत. ओबीसीसाठी स्वतंत्र रकाना (कॉलम) न ठेवता ओबीसींना जनगणनेतून वगळले आहे.
याचा अर्थ ओबीसींचा स्वतंत्र डेटा जमा होणार नाही. त्यामुळे ओबीसीं सर्व सोयी सवलती पासून वंचित राहणार आहेत. ही प्रमुख बाब ओबीसी समाजाने लक्षात घेतली पाहिजे. गेली अनेक वर्षे ओबीसी समाजाला मूर्ख काम करत आहे. अशा जनगणनेतून ओबीसींना फायदा होणार नाही म्हणून ओबीसी बांधवांनी या जनगणनेत सहभागी न होता "आमचा कॉलम नाही आम्ही माहिती देणार नाही." अशी ठोस भूमिका घेतली पाहिजे. सावधानपणे या जनगणनेला सामोरे जावं लागणार आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यातील ओबीसी पुढारी किंवा गावातील शिकलेल्या ओबीसी बांधवांनी ही भूमिका वाडीवर सांगून जागृती करावी. असे चिपळूण ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने सर्व ओबीसी समाजाला सुचित करण्यात येत आहे.

Comments
Post a Comment