असगणी महावितरण उपकेंद्राला मिळाले नाव

मनसेचे संदीप फडकले यांचा पाठपुरावा

खेड : असगणी ग्रामपंचायत हद्दीतील महावितरण उपकेंद्र नामांतराचा दहा वर्षापासून प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. मनसेचे माजी तालुकाध्यक्ष संदीप फडकले यांच्या पाठपुराव्याने उपकेंद्रास आता महावितरण संकुल असगणी ग्रामपंचायत असे अधिकृत नाव प्राप्त झाले आहे.

यापूर्वी उपकेंद्रास लवेल नावाने ओळखले जात होते. मात्र असगणी ग्रामपंचायतीकडून सातत्याने असगणी उपकेंद्र नाव देण्याची मागणी होत होती. गेल्या सहा महिन्यांपासून  संदीप फडकले हा विषय लावून धरत होते. संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला होता. २२ मे रोजी महावितरण संकुल असगणी ग्रामपंचायत अधिकृत फलक उपकेंद्रावर लावण्यात आला आहे.

तब्बल दहा वर्षापासून  प्रलंबित असलेला  प्रश्न निकाली निघाल्याने ग्रामस्थांमधून   समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या कामासाठी असगणी सरपंच, सदस्य व संदीप फडकले यांचे सहकारी  अजय शिगवण, राजेंद्र धाडवे यांचेही  सहकार्य लाभले.

Comments