चिपळुणात होणार पोस्टाचे विभागीय कार्यालय

जूनपासून कारभार सुरू होण्याची शक्यता 

चिपळूण : येथील टपाल कार्यालयावरील मजल्यावर जून महिन्यापासून विभागीय कार्यालय सुरू होणार आहे. त्यामुळे उपविभागांचा कारभार आणखी गतिमान होणार असून  काही तालुक्यांच्या ग्राहकांना आपल्या समस्या सोडवण्यासाठी रत्नागिरी येथे जाण्याचा ताप वाचणार आहे.

सर्वत्र विविध बँका, पतसंस्था यांचा  विस्तार वाढत असला तरी आजही ग्राहकांच्या पोस्टकार्यालय पूर्ण विश्वास ठेवत असून ग्राहकांची संख्या कायम वाढताना दिसत आहे. याकार्यालयाकडून आपल्या सुविधांचा तितकासा प्रचार आणि प्रसार होताना दिसला नसला तरीही  ग्राहक त्याची माहिती घेण्यासाठी कार्यालयात येताना दिसतात.

यातून काही ग्राहक आपल्या तक्रारी  रत्नागिरी येथील मुख्य कार्यालया पर्यंत पोहचविण्यात   विचार करतात. मात्र ते शक्य नाही. त्यातच तक्रार वही ग्राहकांना दिली जात नाही.त्यामुळे विभागीय कार्यालय सुरू झाल्यावर येथे डाकघर अधीक्षक व अन्य अधिकारी, कर्मचारी राहणार असल्याने ग्राहकांना तक्रारी करणे आणि विविध  योजनाची माहिती घेणे सहज शक्य होणार आहे.

Comments