कोकणच्या जागेसाठी रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये राजकीय वातावरण तापले

कोकण स्थानिक प्राधिकरणाचा निवडणूक हायव्होल्टेज ड्रामा सुरू




चिपळूण  : विधान परिषदेच्या रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या जागेसाठी निवडणूक १८ जूनला होणार असून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे.  या जागेसाठी प्रत्येक पक्षाची फिल्डिंग लागली असून तीन जिल्ह्यात १६ मतदार केंद्रावर १०१८मतदार मतदान करणार आहेत. त्यामुळे ही जागा आता कोणाच्या पदरात जाणार याची चर्चा रंगत आहे. 

कोकण स्थानिक प्राधिकरणाचा रणसंग्राम आता शिगेला  पोहोचला आहे.  या हायव्होल्टेज निवडणूकसाठी येत्या १८ जून रोजी बॅलेट पेपर द्वारे मतदान होणार आहे.  तीन जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.  या निवडणुकीत सामान्य जनता स्टेट मतदान करत नाही.  तिन जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य, नगरपरिषद व नगरपंचायतीचे निर्वाचित सदस्य नगराध्यक्ष आणि पंचायत समितीचे सभापती या मतदानासाठी पात्र असतात. सर्वाधिक मतदार रायगड जिल्ह्यात आहेत. 

यामध्ये रत्नागिरी केंद्रावर  ७५ चिपळूण ६८ राजापूर ५५ दापोली ४८, खेड ३१, सावंतवाडी ८५,  कणकवली ७९, कुडाळ ५९,  पनवेल १२३, कर्जत ११३, अलिबाग ५७, महाड ५०, रोहा ४८,  श्रीवर्धन ४७, माणगाव ४६ व पेण ३४ जिल्ह्यातील मतदारांचा तपशील आहे. रायगड जिल्ह्यात ५१८ मध्ये  रत्नागिरी मध्ये २७७ आणि सिंधुदुर्गामध्ये २२३ मतदार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी,  राजापूर, चिपळूण, खेड आणि  दापोली अशी पाच मतदान केंद्र आहेत. तर सिंधुदुर्ग मध्ये सावंतवाडी कुडाळ आणि कणकवली अशी तीन मतदान केंद्र आहेत. रायगड जिल्ह्यात महाड, माणगाव, श्रीवर्धन, रोहा, अलिबाग, पेण,  कर्जत आणि पनवेल अशी आठ मतदान केंद्र आहेत.

 १ जून ही अर्ज भरण्याची शेवटची मुदत असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रत्येक पक्ष या जागेसाठी जोरदार फील्डिंग लावत आहे. रायगड जिल्ह्यात सर्वाधिक ५१८ मतदार असल्याने निवडणुकीची खरी चावी रायगड जिल्ह्याच्या हातात असणार आहे, असे बोलले जात आहे.  या निवडणुकीची मतमोजणी मुख्य केंद्र रत्नागिरी कुवारबाव येथील सिंचन भवन येथे होणार आहे.  निवडणुकीचा निकाल २२ जूनला लागणार असून त्या दिवशी जागा कोणाच्या पारड्यात पडणार हे स्पष्ट होणार आहे.

Comments