चिपळूण येथे श्री रामराजे कॉलेज ऑफ नर्सिंग, चिपळूण या नवीन नर्सिंग कॉलेजचा शुभारंभ
चिपळूण :डिस्टिंक्टिव्ह एज्युकेशन सोसायटी संचालित श्री रामराजे कॉलेज ऑफ नर्सिंग, चिपळूण या नवीन नर्सिंग कॉलेजचा शुभारंभ सोहळा रविवारी दि. १० मे २०२६ रोजी दापोली अर्बन बँकचे चेअरमन डॉ. जयंवत जालगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.
चिपळूण येथील कविळ तळी जीव्हाळा मार्ट बिल्डिंगमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन दापोली अर्बन को-ऑप बँकेचे चेअरमन .डॉ. जयवंत जालगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दिपक हर्डीकर उपस्थित होते. मा. मंगेश पेडांबकर उपमुख्याधिकारी, चिपळूण महानगरपालिका तसेच ब्रम्हकुमारी सेवा केंद्र, चिपळूण च्या डी. के. दिपा बहेनजी, रामराजे कॉलेजच्या डायरेक्टर रुचिता नलावडे, मृदुला निंबकर,रामराजे महाविद्यालयाचे संस्थापक सीईओ संदीप राजपुरे तसेच संस्थेच्या अध्यक्षा स्मिताली राजपुरे यांची विशेष उपस्थिती लाभली.कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस जयंद्रत खताते, महाराष्ट्र प्रदेश महिला सरचिटणीस दिशा दाभोळकर, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष, मा. दत्ताराम गोठल,HDFC Bank चे क्लस्टर हेड दिनेश कुमार, RDC बँक शाखा दापोली च्या मॅनेजर स्वप्नाली कालेकर, जिव्हाळा मार्टचे मालक संतोष पेडांबकर, उपस्थित होते.
यावेळी रत्नागिरी कॉलेज ऑफ नर्सिंग येथील मृणाल गिजबिले, लीनाली खेडेकर, प्रेरणा आग्रे तसेच देवरुख ऑफ इन्स्टिट्यूट येथील संध्या नाले, इशिता कांगणे, ओंकार घडशी, निनाद कांगणे उपस्थित होते. रामराजे दापोलीच्या आदिती भुवड आणि मधुरा कांबळे उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे उद्घाटक अर्बन बँकेचे चेअरमन मा. डॉ. जयवंत जालगांवकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की रामराजे महाविद्यालयात शिकणाऱ्या विध्यार्थिनींच्या शैक्षणिक कर्जासाठी अर्बन बँकेचा कोरा चेक तयार असेल.
मान्यवरांनी आपल्या मनोगतात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण नर्सिंग शिक्षणाची गरज अधोरेखित करत, या नव्या संस्थेमुळे परिसरातील विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. आधुनिक सुविधा, अनुभवी प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षणपद्धतीमुळे हे कॉलेज भविष्यात आरोग्य क्षेत्रात सक्षम मनुष्यबळ घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
तसेच रामराजे ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य वेदिका राणे, मराठा मंदिर, रामराजे, आर. आर वैद्य या तिन्ही शाळांचे समन्वयक : प्रा. कुणाल मंडलिक, रामराजे कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे प्राचार्य डॉ. तुषार लिंगायत , रामराजे इंटरनॅशनल स्कूलचे प्रिंसिपल .शेखर पाटील, मराठा मंदिर स्कूल चे प्रिंसिपल.अरविंद मांडवकर प. पू साने गुरुजी महाविद्यालयाचे प्राचार्य. मुरलीधर यदमल,उपस्थित होते.कार्यक्रमास संजय साळवी, प्रभाकर मोरे, लायन.जगदीश वाघुळदे, अर्बन बँकेचे संचालक.संदीप दिवेकर, पत्रकार ॲड भाई कुळे, रवींद्र उदेग आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक कुणाल मंडलिक यांनी केले तर चिपळूण कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्रणाली कोंडवीलकर, मिनाक्षी तांबे, यांनी सर्वाचे आभार मानले.

Comments
Post a Comment