चिपळूण पेठमाप परिसराची भाजपा रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी केली पाहणी
नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा रूपाली दांडेकर यांना केल्या सूचना
चिपळूण : चिपळूण नगर परिषद उपनगराध्यक्षा रूपालीताई दांडेकर यांच्या समवेत शहरातील पेठमाप परिसर आणि नदी किनाऱ्यांवरील विविध भागांची भाजपा रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी पाहणी केली. तसेच विविध समस्या व अडचणी समजून घेतल्या. यासोबतच संभाव्य पूराचा धोका लक्षात घेऊन नगरपरिषद प्रशासनाने तिथे तातडीने संरक्षक भिंत बांधावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
शहरातील वाशिष्ठी नदीच्या काठावर असलेला पेठमाप हा एक महत्त्वाचा आणि वर्दळीचा भाग आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात येथील परिस्थिती अतिशय गंभीर बनते. परिणामी, पावसापूर्वी नियोजन करून उपाययोजना केल्यास, भविष्यात कोणतीही आपत्ती निर्माण होणार नाही. कारण, २०२१ च्या महापुरात आपण सर्वांनी येथील परिस्थिती अनुभवली आहे. त्यामुळे संरक्षक भिंतीसह इतरही उपाययोजना करण्याकडे विशेष लक्ष द्या, असेही उपनगराध्यक्षा रूपालीताई दांडेकर यांना आवर्जून सांगितले. यावर संबंधित विभागाशी चर्चा करून आपल्या सर्व मागण्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी भाजपाचे जिल्हा महामंत्री स्वानंद रानडे, सभापती शुभम पिसे, नगरसेवक शशिकांत मोदी, माजी नागसेवक आशिष खातू, राकेश दांडेकर, अमोल तटकरी आणि शक्ती चव्हाण आदी उपस्थित होते.

Comments
Post a Comment