मुंढर आडीवाडी येथे १३ मे पासून श्री साई सोहळ्यास प्रारंभ

यावर्षी साई मंदिरचा १७ वा वर्धापन दिन कार्यक्रम

चिपळूण : गुहागर तालुक्यातील श्री साईधाम मित्र मंडळ खुर्द मुंढर आडवाडी आयोजित श्री साईबाबा मंदिराचा १७ वा वर्धापन दिन सोहळा दिनांक बुधवार १३ व १४ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. 

मंडळाच्या दरवर्षी श्री साई सोहळा आणि मुलांचा कौतुक सोहळा साजरा केला जातो. यावेळी मुंबई, पुणे आणि स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मिळून हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.

यावर्षी साईमंदिराचा १७ वा वर्धापन दिन साजरा करताना बुधवार १३ मे रोजी दुपारी २ वाजता श्री साईबाबा यांच्या पालखीची   मिरवणूक होईल. त्यानंतर गुरुवार १४ मे रोजी सकाळी ७ वाजता अभिषेक, सकाळी ८ ते ११ श्री सत्यनारायणाची महापूजा,  सकाळी ११ वाजता महाआरती, दुपारी १२ते २ महाप्रसाद, दुपारी ३ ते ४ वाजता हळदीकुंकू, सायंकाळी ४ वाजता कीर्तन,  सायंकाळी ६ वाजता भजन,  रात्री ७ वाजता दिंडी सोहळा,  रात्री ९ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री १० वाजता विद्यार्थी गुणगौरव व  सत्कार सोहळा, रात्री ११ वाजता एवन श्री केदारनाथ नमन मंडळ सावर्डे भुवडवाडी चिपळूण यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम होईल.  या साई सोहळ्याला सर्व साई भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments