गडनदी घेणार मोकळा श्वास;
आरवली पूल ते भुवडवाडी पर्यत गाळ उपश्याचे काम पूर्ण
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथील गडनदी पात्रातील गाळ उपसा झाला असून भुवडवाडी पर्यत गाळ उपसा पूर्ण झाला आहे. उर्वरित गाळ उपसा करण्यात येत असून येत्या पावसाळापूर्वी सर्व गाळ उपसा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आमदार शेखर निकम यांच्या सहकार्याने जलसंपदा विभागाच्या वतीने हे काम हाती घेण्यात आले आहे.
या गाळ उपसा प्रकल्पासाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून आरवली गडनदी पुलापासून भुवडवाडीपर्यंत सुमारे दोन किलोमीटर अंतरावर गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले आहे.या उपक्रमामुळे नदीपात्राची वहनक्षमता वाढून पूरस्थितीचा धोका कमी होण्यास मदत होणार आहे.या कामात स्थानिक ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांचे मोठे सहकार्य लाभत आहे.
यामध्ये सरपंच निलेश भुवड, नाना कांगणे, दिनेश गुरव, महेंद्र अंबोरे, राजाराम भुवड, सचिन बने, महेश नाचरे, महेंद्र भुवड, अनंत जुवळे, दत्तात्रय परकर, दत्ताराम भुवड, पोलीस पाटील दत्ताराम लांबे, हेमंत खोचाडे, राजेश फणसे, दिपक जाधव, उमेश लघाटे, रविंद्र लांबे, प्रवीण भुवड, मिलिंद भुवड, सुरेश फणसे आणि आदित्य शिंगण यांचा सहभाग उल्लेखनीय आहे.स्थानिकांच्या मते, या गाळ उपशामुळे पावसाळ्यात होणारा पाण्याचा ताण कमी होईल आणि शेती तसेच परिसरातील सुरक्षिततेस मोठा फायदा होणार आहे.

Comments
Post a Comment