विभा अरविंद ग्रंथालय वाचकांसाठी दिशादर्शक ठरेल - आ शेखर निकम
चिपळूण खेंड येथे नवीन ग्रंथालयाचे उद्घाटन
चिपळूण. : नव्या पिढीच्या उत्कर्षासाठी ग्रंथालय मोलाची कामगिरी बजावतात. सुसंस्कृतपणा आणि शब्दसामुग्री आपल्याला वाचनातून उपलब्ध होते. डॉ. यतीन जाधव आणि परिवार म्हणजे सामाजिक बांधिलकी जपणारे कुटुंब आहे. त्यांनी सुरू केलेले विभा अरविंद ग्रंथालय पुढील काळात दिशादर्शक ठरेल असे , गौरव उद्गार चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केले.
चिपळूण शहरातील खेंड स्प्रिंग हॉस्पिटल येथे विभा अरविंद वाचनालय सुरू करण्यात आले आहे. यावेळी ते बोलत होते. या वाचनालयाचे उद्घाटन नगरसेवक अंकुश आवले आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात पुढे बोलताना आ शेखर निकम म्हणाले की, वाचणं समाजाची गरज आहे. मोबाईल आणि प्रत्यक्ष वाचन करणे यात फरक आहे. वाचनाने नवीन माहिती मिळत असते. नव्या पिढीला वाचन प्रक्रियेत आणले पाहिजे. गाव तिथे वाचनालय ही संकल्पना रुजली पाहिजे. अप्पांनी जे कार्य केले आहे. त्याला डॉ यतीन जाधव आणि परिवार पुढे घेऊन जात आहेत. त्यांच्या विचारांचा वारसा ते जपत आहेत. विभा अरविंद ग्रंथालय सुरू करून त्यांनी सामाजिक बांधिलकीचे मोठे पाऊल टाकले आहे. स्पर्धा परीक्षांची पुस्तके ही मोठी संपदा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला कृषिभूषण डॉ तानाजी चोरगे, प्रकाश देशमुख, नगरसेवक अंकुश आवळे, नगरसेविका नीलिमा जाधव , राणी महाडिक, माजी आ. रमेश कदम, लोस्टिमा कार्याध्यक्ष अरुण इंगवले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत, विभा अरविंद ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश काणे, नगरसेवक अजय भालेकर, नगरसेवक निहार कोवळे , प्रसाद प्रशांत डमढेरे, प्रसाद रिसबूड, डॉ यतीन जाधव, डॉ वैशाली जाधव, संतोष देशमुख, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.जोशी आणि आभार प्रदर्शन विजय कदम यांनी केले.

Comments
Post a Comment