बामणोली येथील स्मिता तांबिटकर यांचे मुंबई येथे दुखद निधन 

आईवडिलांचे छत्र हरपल्याने दोन्ही मुले झाली पोरकी



चिपळूण  : तालुक्यातील बामणोली पूर्वतांबेवाडी येथील स्मिता सुजित तांबिटकर या मुंबई कांदिवली येथे राहत होत्या.  गेले काही दिवस त्या गंभीर आजाराने मृत्यूशी झुंज देत  हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या.  मात्र गुरुवार २८ मे रोजी  त्यांची  झुंज  प्राणज्योत मावळली.  त्यांचे दुःखद निधन झाले. तांबिटकर  परिवारासाठी हा मोठा   धक्का आहे.

बामणोली  पूर्व तांबेवाडी येथील गोरिवली परिवारातील स्मिता हिने वाडीतील  सुजीत महादेव तांबिटकर  यांच्या सोबत  लग्न केले होते.  लग्नानंतर मुंबईमध्ये त्या स्थायिक होत्या.  मात्र काही वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले आणि त्यांच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. अशावेळी न  डगमगता  त्यांनी संसाराचा गाडा पुढे नेला.  आपल्या दोन मुलांना सोबत घेत अतिशय परिश्रम करत मुंबईसारख्या ठिकाणी मुलांचं संगोपन केले.   मात्र काही महिन्यांपूर्वीच स्मिता या आजारग्रस्त झाल्याने हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या.  हॉस्पिटलमध्ये  त्यांच्यावर उपचार सुरू होते.  त्यासाठी आर्थिक खर्च सुद्धा मोठा  होता.  त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होईल असे वाटत असताना अचानक त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले. अखेर २८ मे रोजी स्मिता सुजित तांबिटकर यांचे मृत्यूची कडवी झुंज देण्याचे सामर्थ्य संपले आणि  त्यांचे निधन झाले.

 अतिशय प्रेमळ आणि सुस्वभावी असे त्यांचे व्यक्तिमत्व होते.  त्यांच्या पश्चात त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.  त्या दोघांना चांगले शिक्षण देण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. आता मात्र ही दोन्ही मुलं आई-वडिलांचे छत्र हरपल्याने पोरकी झाली आहेत.  कांदवली बानडोंगरी येथे त्या वास्तव्य करीत होत्या.    मुंबईतच त्यांच्या देहावर  अंतिम संस्कार केले जाणार आहेत.  तांबिटकर आणि गोरिवली परिवारासाठी ही अतिशय दुःखद घटना आहे. या घटनेमुळे बामणोली गावातून हळहळ  व्यक्त होत आहे.




Comments