नवतरुण मित्र मंडळ बामणोली डिंगणकरवाडीच्या अध्यक्षपदी ॲड संतोष भाई कुळे
तर सचिव पदी सुनील बोबले
मुंबई मंडळाने दिल्या नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा
नवतरुण मित्र मंडळ डिंगणकरवाडी या मंडळाला सुमारे ९३ वर्ष झाली आहेत. अतिशय खडतर प्रवास मंडळाने केलेला आहे. शतक महोत्सवाकडे मंडळाची वाटचाल सुरू आहे. अनेक उपक्रम आपल्या स्वबळावर राबवले आहेत. याच मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष पदी ॲड संतोष भाई कुळे, उपाध्यक्ष रघुनाथ गोरीवले, सचिव सुनील बोबले, सहसचिव बाबुराव डिंगणकर, खजिनदार कृष्णा कुळे, सहखजिनदार तुकाराम डिंगणकर व अल्पेश डिंगणकर या सर्वांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या नूतन कार्यकारिणीला उपस्थित सर्व सभासदांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ओम पोवाडेबाजी उत्कर्ष मंडळ डिंगणकरवाडी मुंबई या मंडळाने सुद्धा या नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. या सभेला मुंबई मंडळाचे सदस्य सुभाष तांबीटकर, अजित तांबिटकर आणि अंकेश डिंगणकर उपस्थित होते. या आधीच्या मंडळाच्या कार्यकारिणीचे सुद्धा उत्तम कार्य केल्याबद्दल सभासदानी अभिनंदन केले.

Comments
Post a Comment