बामणोली येथील सरस्वती गणू वणे यांचे दुःखद निधन 


चिपळूण  : तालुक्यातील नवतरुण मित्र मंडळ बामणोली डिंगणकरवाडी येथील सभासद  सरस्वती गणू वणे यांचे दिनांक २९ मे रोजी सकाळी मुंबई येथे दुःखद निधन झाले.

अतिशय कष्टाळू आणि प्रेमळ स्वभावाच्या त्या असल्यामुळे त्यांचे सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांनी आयुष्यात खूप परिश्रम घेऊन संसाराचा रथ पुढे नेला होता. गत वर्षी त्यांच्या मुलाचे निधन झाले. त्यामुळे त्यांना हा मोठा धक्का होता. त्यातून त्या सावरण्याचा प्रयत्न करीत होत्या. मात्र, शारीरिक व्याधींनी त्रस्त असल्याने  शुक्रवार २९ मे रोजी सकाळी त्यांचे निधन झाले. मुंबई भांडुप येथे त्या सुने सोबत राहत होत्या. त्यांच्या पश्चात सून, दोन नातू, दोन मुली असा परिवार आहे. अचानक त्यांचे निधन झाल्यामुळे वणे परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच सर्वांनी हळहळ व्यक्त केली आहे.

Comments