कुणबी सेवा संघ तसेच नवभारत छात्रालय दापोली यांच्याकडून खांदाट पाली येथे भाजीपाला बियाणे वाटप
चिपळूण:- सध्याच्या महागाईच्या दिवसामध्ये गावातील ग्रामस्थानी स्वतः भाजीपाला पिकवून केमिकल मुक्त आणि सेंद्रिय भाजीपाल्याच सेवन कराव तसेच शेतीची आवड निर्माण व्हावी यासाठी कुणबी सेवा संघ तसेच नवभारत छात्रालय दापोली यांच्या तर्फे खांदाट पाली येथे ग्रामस्थांना मोफत भाजीपाला बियाणे वाटप करण्यात आले
26 मे रोजी हा कार्यक्रम खांदाट पाली येथे सकाळी दहा वाजता संपन्न झाला या वेळी संस्थेच्या उपस्थितांची ओळख करून देण्यात आली व संस्थेच्या उपक्रमाची माहिती देऊन बियाणे वाटप करण्यात आले त्यानंतर बियाण्याची लागवड कशी करायची याच प्रात्यक्षिक दाखवण्यात आल यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे, हरिश्चंद्र कोकमकर, प्रभाकर तेरेकर, सुनील गुरव, माणदेशी फाउंडेशन च्या श्रद्धा रेडीज, खांदाट पाली चे माजी सरपंच अजय महाडिक व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी अजय महाडिक यांनी संस्थेने गेल्यावर्षी खांदाट पाली येथे चिकू, कोकम, काळीमिरी ही रोपे वाटलेली होती याची आठवण करून देत यावर्षी भाजीपाला बियाणे वाटप केल्याबद्दल आभार मानले व संस्थेच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या व ग्रामस्थांनीही आभार व्यक्त केले

Comments
Post a Comment