आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत भाजप रत्नागिरी उत्तर जिल्हा कार्यकारणी बैठक उत्साहात संपन्न



खेड  : मोदी सरकारची 12 वर्षे - विश्वास, विकास व जनकल्याण” अभियानासाठी मंडलनिहाय नियोजन; पर्यावरण दिन, शिवराज्याभिषेक दिन, योग दिनासह विविध उपक्रमांवर चर्चा करण्यात आली.

भारतीय जनता पार्टी रत्नागिरी उत्तर जिल्हा कार्यकारणी बैठक विधान परिषद आमदार मा. प्रमोदजी जठार साहेब तसेच जिल्हाध्यक्ष सतीशजी मोरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत खेड येथील पाटणे रेस्टॉरंटमध्ये उत्साहात संपन्न झाली.या बैठकीत “मोदी सरकारची 12 वर्षे - विश्वास, विकास व जनकल्याण” या अभियानांतर्गत रत्नागिरी उत्तर जिल्ह्यातील प्रत्येक मंडलनिहाय विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले.

   बैठकीमध्ये 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त “एक झाड आईच्या नावाने” या अभियानांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच 6 जून शिवराज्याभिषेक दिनानिमित्त तालुक्यातील गड-किल्ले व शिवस्मारक परिसरात स्वच्छता अभियान राबवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

 यासोबतच विशेष जनसंपर्क अभियान, मोदी सरकारच्या उपलब्धीचे प्रदर्शन, विविध स्पर्धांचे आयोजन, 21 जून रोजी जागतिक योग दिन, 25 जून रोजी आणीबाणीच्या 51 वर्षांच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम तसेच 25 ते 30 जून दरम्यान जनकल्याण शिबिरांचे आयोजन यावर सविस्तर चर्चा करून नियोजन करण्यात आले.

  बैठकीत SIR अंतर्गत मतदार यादी विशेष सखोल पुनरावलोकन, ‘मन की बात’ कार्यक्रम तसेच विविध संघटनात्मक विषयांवर चर्चा व विचारविनिमय करण्यात आला. यावेळी आमदार प्रमोदजी जठार साहेब यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत संघटन बळकटीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले.

 या बैठकीस भाजपाचे नेते वैभव खेडेकर, जेष्ठ नेते राजूभाई रेडीज, जिल्हा महामंत्री निलेश सुर्वे, वसंत ताम्हणकर, अक्षय फाटक यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा चिटणीस, कोषाध्यक्ष, मोर्चा, आघाडी, प्रकोष्ठ जिल्हा पदाधिकारी, जिल्हा निमंत्रित सदस्य, मंडल अध्यक्ष व मंडल सरचिटणीस उपस्थित होते.

Comments