रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी सुनील चव्हाण यांची निवड
चिपळूण:- भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या विचारसरणीवर आणि पक्षाच्या ध्येय धोरणांवर विश्वास ठेवून उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी सुनिल चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याबाबतचे नियुक्ती पत्र काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शशांक बावस्कर ,जिल्हाध्यक्ष सोनल लक्ष्मी घाग यांच्या हस्ते देण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्याची आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा काँग्रेस कमिटीच्य सचिवपदी निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे

Comments
Post a Comment