आमदार किरण सामंत यांचा अनोखा उपक्रम; मतदार संघातील शाखाप्रमुखांना फळझाडांचे वाटप
राजापूर : मतदारसंघात केवळ राजकीय आणि सामाजिक कार्याचा विस्तार न करता, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि कृषी समृद्धीला चालना देण्यासाठी आमदार किरण सामंत यांनी एक कौतुकास्पद पाऊल उचलले असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे तालुका प्रमुख दिपक नागले यांनी केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तळवडे येथील प्रभावती सभागृहात फणस कलमांचे शाखा प्रमुखाना वाटप करण्यात आले. यावेळी ते पदाधिका-यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. तळवडे जिल्हा परिषद गटातील सर्व शाखाप्रमुखांना फळशेतीकडे प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना प्रत्येकी ५ फणस फळझाडांचे वाटप करण्यात आले.
'हरित आणि समृद्ध मतदारसंघ' आमदार भैय्या सामंत यांच्या संकल्पनेचा शुभारंभ आज एका विशेष कार्यक्रमात करण्यात आला. "केवळ घोषणा करून पर्यावरण सुधारणार नाही, तर त्यासाठी प्रत्येकाने प्रत्यक्ष कृती करणे गरजेचे आहे. आपले शाखाप्रमुख हे तळागाळातील जनतेशी जोडलेले असतात. त्यांनी स्वतः आपल्या अंगणात किंवा शेतात ही झाडे लावून फळशेतीची सुरुवात केल्यास, संपूर्ण गावासाठी तो एक आदर्श ठरेल, असे मत सामाजिक कार्यकर्ते अॅड. साईराज कोलते यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
केवळ राजकीय कार्यक्रम न घेता, थेट निसर्गाशी आणि शेतीशी जोडणारा हा उपक्रम मतदारसंघाला एक नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
यावेळी तालुका प्रमुख दिपक नागले, जिल्हा परिषद सदस्या सिध्दांली मोरे, पंचायत समिती सदस्या अपेक्षा मासये, सौ. समिक्षा वाफेलकर, पाचल विभाग संघटक आत्माराम सुतार,जेष्ठ कार्यकर्ते आप्पा साळवी, पाचल सरपंच बाबा लाल फरास, विभाग प्रमुख अमर जाधव, शैलेश साळवी, युवासेना तालुका प्रमुख सुनील गुरव, युवासेना विभाग प्रमुख युवराज मोरे, उपविभाग प्रमुख उदय राणे, रविंद्र सावंत आदी मान्यवर उपस्थित होते

Comments
Post a Comment