पाऊस नसल्याने पाण्याची समस्या गंभीर; टँकरने पाणीपुरवठा सुरुच

चिपळूण तालुक्यातील ११ गावांतील २८ वाड्यांचा समावेश

 संग्रहित फोटो

चिपळूण  :  हंगाम सुरू झाला असला तरी तालुक्यात टंचाईग्रस्त गावांना आजही टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. पावसाअभावी नैसर्गिक जलसाठे न भरल्याने ११ गावांतील एकूण २८ वाड्यांची पाणी टंचाईची तीव्रता कायम आहे. या टंचाईग्रस्त गावांचे आता पावसाकडे डोळे लागले आहेत.

दरम्यान, या संबंधित टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा करण्यासाठीप्रशासनाकडे दुसरा टँकर प्राप्त न झाल्याने एका टँकरवर पाणी पुरवठा करताना प्रशासनाला कसरत करावी लागत आहे.तालुक्यात मुबलक पाऊस, असताना फेब्रुवारी, मार्च महिना उजाडताच पाणी टंचाईशी सामना करावा लागतो. कडाक्याच्या उष्प्यात ग्रामस्थ ज्या जलस्त्रोतावर अवलंबून

असणारे नैसर्गिक जलस्त्रोत रिकामे होताच टंचाईग्रस्तांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यास सुरुवात झाली. यावेळी पहिला टैंकर हा डोंगर, दऱ्या-खोऱ्यात राहाणाऱ्या धनगरवाड्यामध्ये धावला. अधिक उष्मा वाढत गेल्यानंतर टंचाईग्रस्त गावांमध्ये आणखीनच वाढ झाली.. सध्या कुडप, डेरवण, अनारी, कोंडमळा, अडरे, सावर्डे, टेरव आकले, नारदखेरकी, परशुराम, वाघिवरे गावातील २८ वाड्यांना टँकद्वरे पाणी पुरवठा करावा लागत आहे. विशेष म्हणजे गतवर्षी पाऊस मे महिन्यात दाखल झाल्याने या टंचाईग्रस्तांना दिलासा मिळाला होता. रिकामे झालेले नैसर्गिक जलस्त्रोत पुन्हा भरल्यानंतर ९ मे २०२५ रोजी पाणी पुरवठा करणारा टैंकर प्रशासनाने बंद केला होता. सद्यस्थितीत मे महिना संपून जून महिना सुरू झाला तरी पावसाने जोर धरलेला नाही. पावसाअभावी नैसर्गिक जलसाठे आजही रिकामे आहेत. यामुळे टंचाईग्रस्तांचे आता पावसाकडे डोळे लागून राहिले आहेत. अशा स्थितीमुळे टंचाईग्रस्तांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची चिन्हे वर्तवली जात आहेत.

दरम्यान, तालुक्यात टंचाईग्रस्त गावाची संख्या लक्षात घेता पंचायत समितीने ३ तीन टैंकर अधिग्रहित केले आहेत. त्यापैकी एक टैंकर प्रशासनास प्राप्त झाला असून त्याद्वारे टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र पाणीटंचाईच्या झळा कमी होत नसल्याने एका टँकरने पाणीपुरवठा करण्यात अडथळे निर्माण होत आहेत.

Comments