चिपळूण नगरपरिषदेची हिरवळ ठरतेय नवी ओळख
मियावाकी जंगलासह शहरातील वृक्षलागवड बहरली;
उद्यान विभागाचे कौतुकास्पद काम
चिपळूण : गेले काही दिवस पावसाने दडी मारली होती. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. मात्र आता जोरदार पाऊस पडत असल्यानं चिपळूण शहरातील हिरवळ चांगलीच फुलली आहे. ही बाब मात्र दिलासा देणारी आहे. चिपळूण नगरपरिषदेच्या उद्यान विभागाने माझी वसुंधरा अभियानांतर्गत केलेल्या वृक्षलागवडीमुळे शहराचे सौंदर्य खुलले असून पर्यावरण संवर्धनालाही मोठी मदत होत आहे.
गोवळकोट येथील हिंदू स्मशानभूमीत तयार करण्यात आलेले मियावाकी जंगल सध्या लक्षवेधी ठरत आहे. बांबूसह विविध औषधी वनस्पती व झाडांचे संगोपन केल्याने येथील ८५ टक्क्यांहून अधिक झाडे चांगली वाढली आहेत. हिरवाईमुळे स्मशानभूमीतही शांतता व गारवा निर्माण झाला आहे.
याशिवाय अटलबिहारी वाजपेयी पार्किंग परिसर, खंड गणपती मंदिर परिसर, खेडेकर क्रीडा संकुल, नारायण तलाव परिसर, पेठमाप-भाटण, महाराष्ट्र हायस्कूल रस्ता, पाग गार्डन आदी ठिकाणी केलेली वृक्षलागवड आता बहरली आहे.
ताम्हण, सीता अशोक, बहावा, जांभूळ, कांचन, आवळा, चिंच, आंबा, फणस, करंज, बांबू अशा विविध झाडांचा यात समावेश आहे. उद्यान विभागाचे प्रमुख प्रसाद उर्फ बापू साडविलकर यांनी मुख्याधिकारी संजय जाधव, उपमुख्याधिकारी मंगेश पेढांबकर व प्रमोद ठसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली झाडांचे संवर्धन केले आहे.पाण्याच्या टंचाईच्या काळातही चिपळूणची ही हिरवाई नागरिकांना गारवा आणि सकारात्मक ऊर्जा देत आहे.
मिया बाकी जंगल म्हणजे...
मियावाकी ही जपानमधील प्रसिद्ध वृक्ष लागवड पद्धत आहे. या पद्धतीत स्थानिक झाडे एकमेकांच्या जवळ लावली जातात. कमी जागेतून घनदाट जंगल तयार केली जाते. झाडांची वाढ जलद होते. पर्यावरण तापमान नियंत्रण व जैवविविधतेसाठी हे उपयुक्त ठरते कमी जागेत लवकर तयार होणारे जंगल म्हणजे मियावाकी जंगल होय.
उद्या उद्यान विभागाचे कौतुक
उद्यान विभागांनी गेल्या पाच वर्षात बारा हजारापेक्षा जास्त झाडे लावले आहेत ते पंचवीस टक्के पेक्षा जास्त झाले त्यांना जगवल्या आहेत झाडांना पाणी देण्यासाठी त्यांची संवर्धन करण्यात सर्व काम वेळोवेळी केल्याने लहान मोठी झाडे आज हिरवीगार दिसत आहेत त्यामुळे पालिका प्रशासनाचे उद्यान विभाग कौतुकास पातळी ठरत आहे.

Comments
Post a Comment