यशवंत विद्यालयात शैक्षणिक साहित्याचे वाटप

 


खेड : पंधरागाव विभाग जनता माध्यमिक शिक्षण संस्था संचलित यशवंत विद्यालय कनिष्ठ कला वाणिज्य महाविद्यालय धामणंद येथे छत्रपती शाहू महाराज जयंती या कार्यक्रमाचे औचित्य साधून काळ भैरवनाथ फाउंडेशन पुणे यांच्यावतीने शैक्षणिक साहित्याचे सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. 

यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस जी पाटील सर हे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक काळ भैरवनाथ संस्थेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अरविंद महापदी यांनी केले. यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले यामध्ये स्कूल बॅग, छत्री, वह्या, कंपास पेन पेन्सिल इत्यादी शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना देण्यात आले. यावेळी पोलादपूर तालुकाध्यक्ष दीपक उत्तेकर यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच मंडळाचे कार्याध्यक्ष कृष्णाजी उतेकर यांनी या संस्थेच्या कार्याविषयी माहिती सांगितली. यावेळी विकास शिंदे अरविंद महापदी रवींद्र मोरे राजेश पवार कृष्णाजी उतेकर वैभव जाधव दीपक उत्तेकर रामदास सुर्वे माजी सरपंच विष्णू कदम धामणंद गावचे माजी सरपंच वाघमारे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन पालांडे जयराम उत्तेकर पालक विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सावंत  तर आभार प्राध्यापक के.बी .कसबे यांनी केले. 

यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Comments