नवतरुण मित्र मंडळ डिंगणकरवाडीने श्रमदानातून स्वखर्चाने बांधले गटार

 



चिपळूण   : तालुक्यातील नवतरुण मित्र मंडळ डिंगणकरवाडी या मंडळाने   हनुमान रोड ते डिंगणकरवाडी या रस्त्याच्या गटार बांधणी साठी स्वखर्चाने जांभा दगड लावत  गटार बांधले आहे. यासाठी मंडळाच्या सभासदांनी श्रमदान करत सामाजिक बांधिलकी जपली आहे.

काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतच्या माध्यमातून हनुमान रोड ते डिंगणकरवाडी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले.  यावेळी गटार  खोदण्यात आले.  मात्र जास्त खोलीचे गटावर पडल्यामुळे रस्त्याच्या कडा  घसरण्याची शक्यता होती.  यासाठी नवतरुण मित्र मंडळ यांनी या रस्त्याची देखभाल करताना त्या गटाराला जांभा दगड लावत गटार बांधण्याचे काम केले आहे. मंडळाने स्वखर्चाने हे काम करत श्रमदान सुद्धा केले आहे.  

यावरून मंडळाची कार्यक्षमता आणि त्यांचा सामाजिक हेतू स्पष्ट होतो . या गटार बांधण्यासाठी वाडीतील सर्व सभासदांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला . यामध्ये मंडळाचे उपाध्यक्ष रघुनाथ गोरीवले,  सचिव सुनील बोबले, सहसचिव बाबुराव डिंगणकर,  खजिनदार कृष्णा कुळे,  तुकाराम डिंगणकर,  अल्पेश डिंगणकर, यशवंत डिंगणकर,  राजाराम घाणेकर, नामदेव घाणेकर, योगेश कुळे, गंगाराम कुळे, गणपत बोबले, सीताराम तांबिटकर, लक्ष्मण तांबिटकर, दीपक कुळे, आणि सर्व सभासद महिला यांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान केले आहे.  स्थानिक पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम करण्यात आले . मुंबई मंडळाने सुद्धा या स्थानिक मंडळाचे काम केल्याबद्दल  आभार व्यक्त केले आहेत.

Comments