शिवनदी पुल येथे नदीच्या पात्रात प्लास्टिक बाटल्यांचा खच आणि कचरा
पाण्याचा रंग झाला हिरवा; नदीला गटाराचे स्वरूप
चिपळूण : शहरातील शिवनदी पुलाच्या येथे शिवनदीच्या पात्रात बाटल्यांचा खच आणि कचरा साचलेला आहे. या पाण्याचा रंग सुद्धा हिरवा झालेला आहे. शहरातील वाहणारी ही शिवनदी असून आता नदीला गटाराचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. याकडे नगरपालिकेने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
चिपळूण शहरातून शिवनदी वाहत जाते. चिंचनाकापासून पुढे आल्यावर शिवनदी पुल आहे. या पुलाच्या ठिकाणी असलेल्या नदीच्या पात्रामध्ये सध्या बाटल्यांचा खच मोठ्या प्रमाणात साचलेल्या दिसून येतो. त्याचबरोबर काठावरती कचरा सुद्धा टाकलेला आहे. त्यामुळे शिवनदीचे पात्र दूषित झाल्या सारखे दिसते. पाण्याचा रंग हिरवा झालेला आहे. त्यामुळे या शिवनदीला एखाद्या गटाराचे स्वरूप यावे असे पात्र दिसत आहे . काही दिवसापूर्वी शिवनदीतील गाळही काढण्यात आला होता. मात्र तरी या पात्रात कचरा टाकण्यात आला आहे. त्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नदी पात्रात कचरा टाकू नये असा सूचना देऊन सुद्धा तिथे कचरा टाकला जातो. याकडे आता नगरपालिकेने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

Comments
Post a Comment