न्यू इंग्लिश स्कूल खांडोत्री आबिटगाव येथे शैक्षणिक साहित्य वाटप
चिपळूण : तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल खांडोत्री-आबिटगाव येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वह्यांचे वाटप करण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सामाजिक कार्यकर्ते सुरेश भुवड (कळंबट) यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमास खांडोत्री उपसरपंच अमोल कोदारे, आबिटगाव सरपंच सुहास भागडे , सामाजिक कार्यकर्ते सुरेश भुवड यांची प्रमुख उपस्थिती होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक जमादार यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. यानंतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्त्व सांगितले व आगामी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अमोल कोदारे , सुहास भागडे आणि सुरेश भुवड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांना बळकटी देणारा ठरला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.तिकुडवे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन सुर्वे यांनी केले. शेवटी श्री. निंबाळकर यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांचे आभार मानले.

Comments
Post a Comment