केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर चिपळूण शहरात पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केला जल्लोष
चिपळूण : नीट पेपरफुटीनंतर केंद्रीय शिक्षण धमेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा यासाठी जंतर-मंतरवर 26 दिवसापासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु होते. या आंदोलनावेळी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला होता. असे असले तरी केंद्रीय शिक्षण मंत्रि धमेंद्र प्रधान जोवर राजीमाना देत नाही तोवर आंदोलन मागे न घेण्याची भुमिका आंदोलनकर्त्यांनी दर्शवली होती. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर आंदोलनास पाठिंबा तर सरकारच्या दडपाशाहीचा निषेधही केला जात होता. अखेर शनिवारी शिक्षणमंत्री पधान यांनी राजीनामा दिला. यापार्श्वभूमीवर विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी चिपळूण शहरातील चिंचनाका ठिकाणी फटाके वाजवून जल्लोष केला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते मुराद अडरेकर, टि. डी. पवार, सुबोध सावंतदेसाई, युवा नेते राजू जाधव, अक्षय केदारी, वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव संदेश कदम, रिपब्लिक सेनेचे संदेश मोहिते, भीमसैनिक युवा पतिष्ठानेचे आकाश कांबळे, शुभम कदम, प्रफुल्ल मोहिते आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments
Post a Comment