आबलोली येथे प्राकृतिक कार्यशाळा व सेंद्रिय शेती मार्गदर्शन 

भाजपा किसान मोर्चाचे आयोजन

सचिन कारेकर यांनी केले मार्गदर्शन


चिपळूण  : भाजपा किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांच्या सूचनेनुसार आणि उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्या सहकाऱ्याने  रविवार ५  जुलै रोजी उत्तर जिल्हा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा यांच्या वतीने आबलोली येथील गारवा कृषी पर्यटन केंद्र गुहागर येथे प्राकृतिक कार्यशाळा व सेंद्रिय शेती मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सचिन कारेकर हे उपस्थिती होते.

 या सेंद्रिय शेतीच्या कार्यशाळेमध्ये अनेक मान्यवर उपस्थित होते. या सर्वांचे  स्वागत करण्यात आले.  या कार्यक्रमांमध्ये ज्यांनी हळदीची एस के फोर विशेष व्हरायटी निर्माण केली आणि ज्यांचा राष्ट्रपती द्रोपदी मूर्म यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला असे सचिन कारेकर यांनी या कार्यशाळेत सेंद्रिय शेती विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, रासायनिक खतांचा वापर न करता जैविक खतांचा वापर करून विष मुक्त  जमीन केली पाहिजे.  जमिनीचा पोत सुधारण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी सेंद्रिय खते वापरणे गरजेचे आहे, असे त्यांनी  बोलताना सांगितले.

 याच कार्यशाळेमध्ये गुहागर पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे यांनी शेतकऱ्यांशी निगडित असणाऱ्या पशुसंवर्धन विभाग,  गाई पालन, शेळीपालन, कुकुटपालन अशा  योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे सुचित केले.  मंडळ अध्यक्ष अभय भाटकर यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना याविषयी मार्गदर्शन केले. ज्या  शेतकऱ्यांनी केवायसी केली नसेल त्यांनी केवायसी पूर्ण करावी अशी त्यांनी यावेळी सूचना केली. 

त्यानंतर रत्नागिरी उत्तर जिल्हा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष भडवळकर यांनी सांगितले की,  महायुती सरकारने अनेक योजना नागरिकांना दिल्या आहेत.  याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे  आभार त्य्रामीण मानले.  महायुतीच्या सरकारमध्ये महिलांना दिला सन्मान,  शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची निर्मिती  यामुळे गर्मी भागातील शेतकरी सक्षम होण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले. 

 या सेंद्रिय शेती कार्यक्रमाला उत्तर जिल्हा सरचिटणीस व गुहागर पंचायत समिती उपसभापती निलेश सुर्वे, सरचिटणीस वसंत ताम्हणकर, भाजपा गुहागर मंडळ अध्यक्ष अभय भाटकर, सरचिटणीस सचिन ओक,  महिला मोर्चा अध्यक्ष प्रांजल कचरेकर  युवा मोर्चा अध्यक्ष प्रथमेश पाडेकर, गुहागर नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष नीताताई मालप, जिल्हा परिषद अध्यक्ष अपूर्वा बारगोडे,  पंचायत समिती सदस्य मानसी रांगळे, स्नेहाताई शिगवण यांची उपस्थिती लाभली होती. आणि प्रमुख मार्गदर्शक   सचिन कारेकर हे  उपस्थित होते.

Comments