सुधारित प्रधानमंत्री पिक योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
शेतकऱ्यांनी ३१ जुलै पर्यंत लाभ घ्यावा
चिपळूण : सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना सन २०२६ हंगामात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भात व नाचणी या अधिसूचित पिकांसाठी ८३ महसूल मंडळामध्ये योजना राबविण्यात येत आहे. विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसान पासून शेतकऱ्यांचे पिकांना संरक्षण देण्यासाठी ही योजना कार्यरत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी व सहभागी होण्याकरता ३१ जुलै २०२६ अंतिम मुदत आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे चिपळूण तालुका विभागीय कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.
यंदा राज्यांमध्ये अल निनोचे संकट असून यामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे सदस्य त्यांनी गरजेचे असून आर्थिक स्थैर्य योजनेच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांचा पीक विमा योजनेस सहभागास प्राधान्यक्रम असला पाहिजे. योजेंतगरी सहभाग घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक असणे अनिवार्य आहे. तसेच डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत पीक पाहणी करणे बंधनकारक राहील.
रत्नागिरी जिल्ह्यातील ८३ महसूल मंडळ करता धातू नाचणी पिकासाठी योजना लागू आहे. सर्व कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे कुळाने अगर भाडेपट्ट्यांनी शेती करणारे शेतकरी भाग घेण्यास पात्र नोंदणीकृत भाडेकरार पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे. खरीप हंगामासाठी दोन टक्के आणि जोखीम स्तर अधिसूचित पिकासाठी ७० टक्के असा आहे शेतकरी विमा जगोतआहे. योजनेत शेतकरी सहभागा साठी प्रति अर्ज कमान किमान ०.१० हेक्टर मर्यादा आहे. पीक कर्ज घेतलेले शेतकऱ्यांना देखील या विमा योजने सहभाग बंधनकारक नाही. शेतकऱ्यांना विमा योजनेत भाग घेण्याची अंतिम दिनांक ३१ जुलै २०२६ असा आहे. इतर बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपला सातबाराचा उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड, पीक पेरणीची स्वयं घोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेत विमा अर्ज देऊन हप्ता भरून सहभाग घ्यावा.
हप्ता भरलेले पोच पावती त्यांनी जपून ठेवावी. आपले सरकार सेवा केंद्र च्या मदतीने आपण विमा योजनेस सहभाग घेऊ शकता किंवा
विमा संरक्षणाच्या बाबी
योजनेअंतर्गत खरीप व रब्बी हंगामा करतात पीक पेरणी पासून काढणी पर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा पीक उत्पादन विपरीत परिणाम करणाऱ्या इतर बाबींमुळे हंगामामध्ये शेवटी पीक कापणी प्रयोग आधारे तांत्रिक उत्पादन आधारे सदर महसूल मंडळामध्ये पिकाचा उंबर उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहीत धरून नुकसान भरपाई देईल राहील.
ऑक्टोबर २०२५ मध्ये पीक काढणीच्या वेळी अवकाळी पाऊस आल्याने पिकाचे नुकसान होऊ शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट झाली होती. त्यामुळे यावर्षी अशा पद्धतीने विविध नैसर्गिक आपत्तीमुळे ही उत्पादनामध्ये घट झाल्यास पिक विमा संरक्षण असल्यास शेतकऱ्यांना नुकसान मिळू शकते.
ईपीक पाहणी
शेतकऱ्यांनी डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत ई पीक पाहणी बंधनकारक राहील. विमा योजनेतून विमा घेतलेल्या पिकात आणि ई पीक पाहणी मध्ये नोंदवलेल्या पिकात काही तफावत आढळल्यास ई पीक पाहणी मध्ये नोंदविलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येईल. या योजनेत खरीप हंगामातील भात व नाचणी यांचा समावेश आहे. शेतकरी हिस्सा भात रुपये ६५० प्रति हेक्टर व नाचणे ४०० रुपये प्रति हेक्टर असा विमा दर ठेवलेला आहे. यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या खरीप पिकाचा विमा काढावा असे आवाहन जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुली यांनी केले आहे.

Comments
Post a Comment