जि.प. शाळा मिरजोळी   येथे आषाढी एकादशी साजरी.

चिपळूण : जि.प. शाळा मिरजोळी चिपळूण या शाळेत आषाढी एकादशी साजरी करण्यात झाली. यातून मुलांना भक्तीचा ठेवा आणि परोपकाराची जाण करून दिली.

विठ्ठल रुक्मीणीसह विविध वेशभूषा परिधान करून विद्यार्थ्यांनी विठूनामाचा गजर करत दिंडी काढण्यात आली. शाळेतील विदयार्थ्यांनी विठ्ठल रुक्मीणी विषयी गीत गायन केले. पंढरपूरच्या विठूरायावरील गाण्यावर नृत्य सादरीकरण करताना मुलांनी आनंद घेतला.  एकादशी-निमित्त सौ. सुलभा मोहिते,  श्रीम. भूस्कुटे  यांच्या सौजन्याने विदयार्थ्यांना खिचडी वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाकरिता श्रीम. सुलभा मोहिते, श्रीम. भुस्कुटे , अंगणवाडी सेविका श्रीम साखरपेकर व श्रीम. जाधव , पालकवर्ग, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. गर्जे व सहकारी शिक्षिका सौ आदावडे  व सौ निर्मळ  उपस्थित होल्या.

Comments