पावसाळ्यात  जिभेचे चोचले पुरवणारा "मका" आरोग्यासाठीही वरदान


संतोष कुळे

चिपळूण : पावसाळा  आणि भाजलेले चटपटीत मक्याचे कणीस हे समीकरण जिभेचे चोचले पुरवणारे आहे.  पाऊस सुरू होताच कोळशाच्या शेगडीवर लिंबू आणि चटपटीत मसाला लावून  भाजलेला मका दिसतातच  अनेकांच्या जिभेला पाणी सुटते.  मात्र, मक्याचे कणीस  आणि त्यातील टपोरे दाणे हे निरोगी आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे. अशा हा मका  अनेक आजारांना नियंत्रित करण्यासाठी  एक बहुगुणी  पर्याय मानला जातो. म्हणून   मका खा... आणि तंदुरुस्त राहा  असे  जुनी  जाणती लोक सांगतात.

  पावसाळा सुरू झाला की झणझणीत हातगाडी वरचे पदार्थ खावेसे प्रत्येकाला वाटतात.  यात जोरदार पावसात  गरमागरम भजी  खाण्याची मजा वेगळीच असते.  मात्र तेलकट पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होत असतो.  परंतु मका हा अतिशय पौष्टिक असून अनेक आजारांवरती तो लाभदायक ठरलेला आहे.  

   मका हा कोकणात कमी प्रमाणातच होत असतो.   मका पिकाची  लागवडी खरीप हंगामात  15 जून ते 15 जुलै या कालावधीत केली जाते. रब्बी हंगामामध्ये 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत त्याची लागवड केली जाते तर उन्हाळी मक्याचे पीक हे जानेवारी ते फेब्रुवारी मध्ये लागवड करून घेतले जाते.  यासाठी गाळाची माती अतिशय उपयुक्त ठरते.    मका उष्ण  व कोरडे हवामानात  उत्तम वाढतो.  मक्याचा परिपक्वता होण्याचा कालावधी सुमारे 65 ते 120  दिवसांचा आहे.   पेरणी केल्यानंतर पाण्याचा व्यवस्थित वापर केल्यावर चार ते पाच दिवसांमध्ये मक्याची रोपे जमिनीतून वरती येऊ लागतात.   मका पिकासाठी नेत्र, स्फुरद,  पालाश आणि शेणखत यांचा वापर बऱ्यापैकी केला जातो.   

मात्र उन्हाळी मक्याची लागवड केल्यानंतर  मक्याची कणसे आपल्याला पावसाळ्यामध्ये चौकाचौकात, रस्तोरस्ती, तसेच शाळेच्या बाहेर मका विक्रीचे स्टॉल पाहायला मिळतात.  कोकणामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ज्या ठिकाणी धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येतात.  अशा ठिकाणी सुद्धा मका कणीस विकणारे  हातगाडी लावून त्या ठिकाणी कोळशाच्या  शेगडीवरती मका भाजून त्याला लिंबू चटणी मीठ लावून दिल्यानंतर हे पर्यटक आवडीने खात असतात. त्याचबरोबर बाजारामध्ये सुद्धा पावसाळ्यात  हातगाडीवरती  मका विकणारे   असतात. 

 एक मका  कणीस  कमीत कमी 20 ते 25 रुपये दराने विकले जाते.  पावसाळ्यामध्ये याची विक्री बाजारात आणि  महामार्गाच्या लगत  छोट्या टपऱ्या  मधून चांगल्या प्रकारे होते.  

मका हा अतिशय आरोग्यासाठी लाभदायक असल्याने त्याचे फायदे सुद्धा फार महत्त्वाचे आहेत.  नुसता पावसाळ्यात जिभेचे चोचले  पुरवण्यासाठी मका आपण खात असलो  तरीही त्यामागील त्याचे जे  फायदे आहेत ते सुद्धा आपल्या लक्षात घेणं फार गरजेचं आहे . मक्यामुळे शरीरातील कार्बोहायड्रेट,  व प्रोटीन नियंत्रित ठेवले जाते.  मधुमेह नियंत्रित करण्यासाठी मदत होते . डोळ्यांच्या आजारावर लाभदायक आहे.  वजन कमी करण्यासाठी मका उपयुक्त आहे. त्याचबरोबर  पचन व्यवस्था सुधारण्यासाठी मका उपयुक्त आहे. कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी सुद्धा मक्याचा  चांगल्या प्रकारे उपयोग होतो.

 या मक्याच्या कणासामध्ये  विटामिन असतात . त्याच्यामध्ये ए, सी,  व्हिटॅमिन असतात.  असा हा आरोग्यासाठी बहुगुणी असलेला मका  निश्चितच लाभदायक आहे असे जुनी वडीलधारी लोक सांगतात.

Comments