ऐन भात लावणीच्या हंगामातच वरुण राजा "वॉन्टेड"
भात लावणीची कामे खोळंबली
चिपळूण : आठवडाभर मुसळधार पडणाऱ्या पावसाला अचानक "ब्रेक"लागला आहे. आठवडा पूर्वी सर्वत्र पाणीच पाणी करून मुंबई सह कोकणामध्ये एक प्रकारची धास्ती निर्माण करणारा पाऊस अचानक म्युट झाल्याने शेतकऱ्यांनामध्ये चिंतेचे वातावरण वातावरण निर्माण झाले आहे. ऐन भात लावणीच्या हंगामातच वरून राजा "वॉन्टेड" झाला असून शेतीची कामे म्हणजेच भात लावणी खोळंबली आहे.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पावसाचे आगमन झाले. मुंबईसह कोकण भागामध्ये पावसाने पाणीच पाणी करून टाकले होते. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्घटनाही घडल्या होत्या. काही शहरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे आठवड्यापूर्वी सुरु झालेला पाऊस असाच कायम सुरू राहील असेच शेतकऱ्यांना वाटले होते. मात्र अचानक पावसाने दडी मारली आहे.
पावसाच्या हंगामातच पाऊस अचानक गायब झाल्याच्या मागचे मुख्य कारण हवामान खात्याला सुद्धा समजू शकले नाही. यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाला. त्यामुळे शेतीचे काम सुद्धा उशिरा सुरू झाली. त्यातूनच जुलैच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे शेतीच्या कामाने वेग आला होता. मात्र आता लावणीच्या हंगामातच पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत. पाणथळ आणि सुकडी अशी शेती कोकणात पाहवयास मिळते. सुका भात शेती लावण्यासाठी जोरदार पाऊस पडण्याची आवश्यकता असते. मात्र, सध्या पाऊसच वॉन्टेड झाल्याने भात लावणीच्या कामाला ब्रेक लावला आहे.

Comments
Post a Comment