सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा सावर्डे येथे आषाढी एकादशी उत्साहात
सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा सावर्डे येथे आषाढी एकादशीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल रखुमाईच्या पालखीसमोर सह्याद्री शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रशांत निकम यांनी श्रीफळ वाढवून तसेच विठ्ठल रखुमाईच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आरती केली.यावेळी सह्याद्री शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी महेश महाडिक, जिल्हा परिषद सदस्य संजय कदम, सई निकम, प्राचार्य रतन कांबळे,प्राध्यापक जे .बी. शिंदे उपस्थित होते.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्राथमिक शाळेत दिंडी सोहळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून टाळ ,मृदंग आणि भगव्या पताका हातात घेऊन "ज्ञानोबा -तुकाराम"," विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" या नाम गजरात दिंडी काढली. विद्यार्थ्यांनी शाळेच्या पटांगणावर रिंगण केले.विठ्ठल रुक्मिणीची पालखी नाचवली. विद्यार्थ्यांनी फुगड्या घातल्या जणू काही पंढरी अवतरल्यासारखे दृश्य निर्माण झाले होते. यावेळी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या विचारांचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेची ओळख झाली आणि शाळेत भक्तीमय व आनंददायी वातावरण निर्माण झाले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी मुख्याध्यापक शकील मोडक, अनिल रेडेकर, सतीश वारे, प्रणित राजेशिर्के, संतोष शिर्के, सेजल साळवी, अक्षता घाग, प्रणिता दिंडे, रसिका सुर्वे, नीलम हुमणे, मनीषा शिंदे, स्मिता सावंत, पूनम चांदेकर, सोनाली सावर्डेकर, रूपाली कुंभार, सायली शिर्के, अंकिता कुंभार, श्वेता मेस्त्री, शीतल सुर्वे, केतकी पाटणकर, समीक्षा पवार, पूनम भुवड ,संजना चव्हाण, आदिती बागवे, अमृता गमरे यांनी प्रयत्न केले.

Comments
Post a Comment