वचनपूर्तीने जिंकला जनविश्वास; जि.प.सदस्या शिवानी सावंत यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

पालकमंत्री उदय सामंत यांच्या निर्देशानंतर प्रशासनाची तातडीची कार्यवाही

 ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण होताच शिरवली-देवखेरकी सुतारवाडी प्रकल्पग्रस्तांचा वीजप्रश्न मार्गी



चिपळूण  : “बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले” या म्हणीची प्रचिती शिरवली-देवखेरकी येलोंदेवाडी लघुपाटबंधारे प्रकल्पातील देवखेरकी सुतारवाडीच्या वीजप्रश्नाच्या निमित्ताने आली आहे. केवळ आश्वासन देऊन थांबण्याऐवजी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा कसा करावा, याचा प्रत्यय अभ्यासू जिल्हा परिषद सदस्या सौ. शिवानी संदीप सावंत यांच्या कामातून दिसून आला. प्रकल्पग्रस्तांच्या वीजप्रश्नासाठी त्यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि प्रश्न मार्गी लागेपर्यंत तो लावून धरला. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून, आज सौ.शिवानी सावंत व संदीप सावंत यांच्या हस्ते ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण होताच प्रकल्पग्रस्तांच्या घरांमध्ये वीजपुरवठा सुरू झाला.        

     दरम्यान उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या संयुक्त बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या वीजप्रश्नाची गंभीर दखल घेण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करून काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश पालकमंत्री उदयजी सामंत यांनी दिल्यानंतर प्रशासनाने तातडीची कार्यवाही करत ट्रान्सफॉर्मरचे काम पूर्ण केले. त्यानंतर आज ट्रान्सफॉर्मरचे विधिवत लोकार्पण करण्यात आले.

      ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित होताच प्रकल्पग्रस्तांच्या घरांमध्ये वीजपुरवठा सुरू झाला आणि अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर घराघरांत दिवे उजळले. हा क्षण प्रकल्पग्रस्तांसाठी अत्यंत आनंदाचा आणि समाधानाचा ठरला.उद्घाटनप्रसंगी सौ.शिवानी सावंत, संदीप सावंत तसेच प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी प्रकल्पग्रस्तांनी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, जि.प. सदस्या शिवानी सावंत आणि संदीप सावंत यांचे मनःपूर्वक आभार मानत,दिलेला शब्द पाळला आणि आमचा अनेक वर्षांचा प्रश्न सोडवून दाखवला. त्याबद्दल आम्ही आपले मनःपूर्वक आभारी आहोत,अश्या भावना व्यक्त केल्या.

        दिलेला शब्द प्रत्यक्ष कृतीत उतरवून लोकांच्या प्रश्नांसाठी शेवटपर्यंत ठामपणे उभे राहणे, हीच जि.प. सदस्या सौ. शिवानी सावंत यांच्या कामाची ओळख असल्याची प्रचिती या निमित्ताने आली. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला वीजप्रश्न मार्गी लागून प्रकल्पग्रस्तांच्या घराघरांत उजेड पसरला आणि त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच या पाठपुराव्याचे खरे यश ठरले.

Comments