श्री चंडकाई वाघजाई ग्रामदेवता मंदिर ट्रस्ट बामणोलीची मुंबई दादर येथे ५ रोजी संयुक्त सभा

सभेत होणार अनेक विषयांवरती चर्चा 


मुंबई : श्री चंडकाई वाघजाई ग्रामदेवता मंदिर ट्रस्ट बामणोली आणि देवस्थानचे मुंबई स्थित सभासद यांची सलग्न सभा रविवार ५ जुलै रोजी  शारदाश्रम विद्यामंदिर, डॉ. भवानी शंकर रोड,  दादर येथे दुपारी ३.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे.

खास मुंबई मधील बांधवांसाठी मंडळाने ही  विशेष सर्व साधारण सभा आयोजित केली आहे.  या सभेसाठी मुख्य ट्रस्टचे सर्व पदाधिकारी आणि काही ज्येष्ठ सभासद हजर राहणार आहेत. 

सदर सभेत विविध मुद्द्यांवरती चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबई येथे असणाऱ्या सभासदांची एक देवस्थान समिती गठित करण्यात येणार आहे. 

या सभेच्या अनुषंगाने प्रत्येक वाडीतील ज्येष्ठ सभासद आणि युवा कार्यकर्ते यांना  आवाहन करण्यात येते की, आपापल्या वाडीतील सर्व सभासदांना सुचित करून सदर सभेस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे. ही सभा  यशस्वी होण्यासाठी मुंबई येथील  काही सभासद प्रयत्न करीत आहेत.  दादर पश्चिम शारदा आश्रम विद्यामंदिर येथे होणार आहे. तरी या सभेला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री चंडकाई वाघजाई देवी ग्रामदेवता मंदिर ट्रस्ट बामणोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments