कोकणी शेतकऱ्यांसाठी वाशिष्टी डेअरीतर्फे उद्या चिपळुणात कृषी मेळावा
चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांचा पुढाकार
"कृषीविषयक माहिती व तंत्रज्ञान" विषयावर मार्गदर्शन
चिपळूण : कोकणी शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, कृषीविषयक माहिती व मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने वाशिष्टी डेअरीतर्फे चिपळूण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हरितक्रांतीचे जनक माननीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या मेळाव्यात कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. या मेळाव्यात "कृषीविषयक माहिती व तंत्रज्ञान" या विषयावर मार्गदर्शन होणार असून, डॉ. सोपान शिंदे (जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था रत्नागिरी), शिवाजी शिंदे (उपविभागीय कृषी अधिकारी, चिपळूण), डॉ. दत्तात्रय सोनवणे (जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त) तसेच शत्रुघ्न म्हेत्रे (तालुका कृषी अधिकारी, चिपळूण) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
हा मेळावा गुरुवार, दि. २ जुलै २०२६ रोजी न्यायलय सहकार भवन, सहकार विश्वास, बहादूरशेख नाका,चिपळूण येथे आयोजित करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वाशिष्टी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी केले आहे.

Comments
Post a Comment