मिरजोळी शाळेतील विद्यार्थ्यांना सुलभा मोहिते यांच्याकडून  स्कूल बॅगचे वाटप

चिपळूण  : सामाजिक कार्यकर्त्या सुलभा मोहिते, मिरजोळी यांनी जि. प. मराठी शाळा मिरजोळी या शाळेतील २२ विदयार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करत सामाजिक बांधिलकी जपली आहे.  

या स्कूल बॅग  वाटप करण्याचा उद्देश वेगळा होता. जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या वाढली पाहिजे. खाजगी शाळांपेक्षा मुले ही जिल्हा परिषद् मराठी शाळेत अधिकाधिक आली पाहिजेत.  सुलभा मोहिते यांनी दुसऱ्यांना सल्ला देण्याआधी स्वतःचे पाल्य मराठी शाळेत शिक्षणासाठी पाठविले आहे. त्यांचा हा आदर्श निश्चितच इतरानी घेण्या सारखा आहे. या शाळेला लाभलेल्या मुख्याध्यापिका मनिषा शेषराव गर्जे  यांनी  पदभार स्वीकारल्यानंतर ११ पटसंख्येवरून मुलांची संख्या २२ पर्यंत वाढवली.  मुलांना स्कूल बॅग वाटप करताना सुलभा मोहिते यांनी सांगितले की, विदयार्थ्यांचा पट वाढावा यासाठी आपण सदैव प्रयत्न करू.  शाळेत एखादी समस्या असेल तर ती सोडविण्यासाठी आपण जमेल तसे सहकार्य करू असे त्यांनी सांगितले. 

शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा गर्जे  यांनी सुलभा मोहिते यांचे स्कूल बॅग वाटप केल्याबद्दल आभार मानले. या शाळेतील विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही शिक्षक वृंद   कटिबध्द आहोत. ग्रामस्थांच्या सहकार्यातून शाळेचा पट वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहु" असे विचार आभार प्रदर्शन करताना मुख्याध्यापिका श्रीम.गर्जे यांनी व्यक्त केले.

Comments