ओबीसी संघर्ष समिती चिपळूण यांच्या वतीने १६ ऑगस्ट रोजी ओबीसी काव्य स्पर्धा

स्पर्धा फक्त ओबीसी समाजासाठी मर्यादित 

चिपळूण : ओबीसी संघर्ष समिती चिपळूण यांच्यावतीने रविवार दिनांक १६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता माता रमाई सभागृह पंचायत समिती शेजारी येथे ओबीसी प्रबोधनात्मक काव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.  ही स्पर्धा   फक्त ओबीसी समाजा पुरती मर्यादित आहे.

ओबीसी समाजातील शाहीर आणि  कवी यांच्या लेखणीला चालना देण्यासाठी, लेखणीतून ओबीसी समाजाचे प्रश्न काव्यरूपी मांडण्यासाठी व समाजात जनजागृती करण्यासाठी या प्रबोधनात्मक ओबीसी काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  या स्पर्धेमध्ये स्वरचित काव्यरचना असणे गरजेचे आहे.  आपलं काव्य सादर करण्यासाठी पाच ते सात मिनिटांचा वेळ दिला जाईल. या स्पर्धेत काव्य लेखन किती दर्जेदार आहे, याचे  परीक्षण स्पर्धेचे परीक्षक करतील.  ओबीसी  समाजातले आरक्षण, शिक्षण, जनगणना, मंडळ आयोग, ओबीसीची सामाजिक स्थिती अशा विषयावरती कवी आपले काव्य सादर  करू शकतात. 

या स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेता २ हजार रूपये आणि प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक १ हजार ५०० रुपये व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक प्राप्त विजेता १ हजार रुपये व प्रमाणपत्र आणि उत्तेजनार्थ दोन पारितोषिक देण्यात येणार आहे. 

ओबीसी समाजात काव्यातून जनजागृती करण्यासाठी हा एक प्रयत्न ओबीसी संघर्ष  समिती चिपळूण यांनी घेतलेला आहे.  या स्पर्धेत सहभागी  होण्यासाठी ९ ऑगस्ट पर्यंत नोंदणी करावी.  ही स्पर्धा फक्त ओबीसी समाजा पुरती मर्यादित आहे. या स्पर्धेत ओबीसी समाजातील सर्व समाजातील कवी शाहीर यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील नंबरवर संपर्क साधावा.  ॲड संतोष भाई कुळे ७०२०९९७९०३,भरत धुलप  ९०६७६१५७७१, संदीप येल्ये ७०३८२१२६०६

समितीचे अध्यक्ष ॲड अशोक निकम, कोषाध्यक्ष प्रकाश, विजय थोरे,  साळवी, सुभाष गुढेकर, चंद्रकांत खोपकर, रवींद्र तांबिटकर,  विलास डिके,  दीपक कदम, संदेश गोरीवले यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होणार आहे.



Comments