चिपळूणच्या अॅड. विश्वास शिगवण यांची राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत डबल कामगिरी;
पटकावली दोन ब्राँझ पदके!
चिपळूण : वयाच्या पन्नाशीतही जिद्द आणि सातत्याच्या जोरावर चिपळूणच्या अॅड. विश्वास शिगवण यांनी राष्ट्रीय स्तरावर झेंडा रोवला आहे. दिल्ली येथे झालेल्या ‘फोर्थ नॅशनल बार अँड बेंच बॅडमिंटन चॅम्पियनशिप’ स्पर्धेत त्यांनी दोन ब्राँझ पदके पटकावत चिपळूणच्या क्रीडा विश्वाचा मान जगात उंचावला आहे.
अॅड. शिगवण यांनी ५० वर्षांवरील पुरुष एकेरी तसेच ५० वर्षांवरील पुरुष दुहेरी या दोन्ही गटांत दमदार खेळाचे प्रदर्शन करत ब्राँझ पदक पटकावले. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत मिळवलेल्या दुहेरी यशामुळे चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राची मान उंचावली आहे.
वय हा केवळ आकडा असून जिद्द, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर कोणत्याही वयात मोठी क्रीडा कामगिरी करता येते, हे अॅड. शिगवण यांनी आपल्या यशातून दाखवून दिले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे युवा तसेच ज्येष्ठ खेळाडूंनाही प्रेरणा मिळाली आहे.
अॅड. विश्वास शिगवण यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल स्थानिक बॅडमिंटन ग्रुपसह चिपळूणकरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Comments
Post a Comment