खांदटपाली भुवडवाडी येथील वसंत कालप यांचे निधन
चिपळूण : तालुक्यातील खांदाटपाली भुवडवाडी येथील वसंत बबन कालप यांचे अल्पशा आजाराने ७ ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कालप परिवारा व दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
खांदटपाली भुवडवाडी येथील हे रहिवासी असून त्यांचे कुटुंब पुणे येथे वास्तव्यास आहे. अतिशय सुस्वभावी असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. सामाजिक कार्याची आवड त्यांना पहिल्यापासूनच होती. अल्पशा आजारामुळे वसंत कालप यांचे निधन झाले. त्यांच्या पुढील सर्व विधी कात्रज पुणे येथे त्यांच्या निवासस्थानी होत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना असा परिवार आहे.

Comments
Post a Comment