घाटकोपर येथे शशिकला संगीत प्रतिष्ठान यांच्या वतीने १६ रोजी शास्त्रीय संगीत मैफिल

सुयोग कुसुरकर मराठे करणार सुरेल गायन


मुंबई : शशिकला संगीत प्रतिष्ठान यांच्या वतीने बढत उपक्रमांतर्गत शास्त्रीय संगीताची मैफिल आयोजित करण्यात येते.  यातून सुरेल संगीत श्रोत्यांना श्रवण करायला मिळते.  याच उपक्रमांतर्गत दिनांक 16 ऑगस्ट सकाळी दहा वाजता छेडा  नगर जिमखाना घाटकोपर पूर्व येथे सुयोग कुसुरकर मराठे या गायन करण्यात आहेत. श्रोत्यांना एक सुरेल मैफिल अनुभवास मिळणार आहे.

भारतीय शास्त्रीय संगीत ही आपल्या संस्कृतीची अमूल्य परंपरा आहे. पूर्वी राजे-महाराजे, संस्थानिक आणि मंदिरे यांच्या आश्रयामुळे ही कला फुलत राहिली. काळ बदलला, आश्रयाची साधने बदलली, परंतु या महान कलेचे जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी आज संपूर्ण समाजावर आली आहे. ही जबाबदारी शशिकला संगीत प्रतिष्ठान यांनी सुरू ठेवली आहे. 

भारतीय अभिजात संगीताची परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावी, रसिकांना विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शास्त्रीय संगीत ऐकायला मिळावे या उद्देशाने शशिकला संगीत प्रतिष्ठान गेले वर्षभर बढत या नावाने शास्त्रीय संगीतची  मैफिल, आयोजित करत आहे.तसेच युवा कलाकार महोत्सव, कार्यशाळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे.बढत या उपक्रमांतर्गत आजपर्यंत 14 महिने 14  युवा कलाकारांनी आपली कला सादर केली आहे. प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या रविवारी ही मैफिल छेडा नगर जिमखाना येथे सकाळी 10 वाजता सादर करण्यात येते.

यावेळी 16ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता सुयोग कुसूरकर मराठे या आपले गायन सादर करणार आहेत. त्यांना तबला साथ सागर मेस्त्री तर हार्मोनियम साथ आदर्श कदम यांनी दिली आहे. सुयोग कुसुरकर मराठे यांनी आजपर्यंत अनेक संगीत मैफिल मधून गायन केले आहे. त्यांचा स्वतःचा एक बाज आहे.   रसिकांना या कार्यक्रमाचा आस्वाद विनामूल्य घेता येणार आहे. या संगीत  कार्यक्रमाला सर्व श्रोत्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शशिकला संगीत प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments