पुरोगामी कलगीतुरा समाज मंडळ चिपळूण यांच्या वतीने ब्रीद पूजन
चिपळूण : पुरोगामी कलगीतुरा समाज मंडळ चिपळूण यांच्या वतीने ब्रीद पूजन कार्यक्रम मालघर येथे राजेंद्र पवार यांच्या निवासस्थानी पार पडला.
शक्ती तुरा लोककला सादर करताना शक्ती आणि तुरा या दोन्ही पंथांसाठी ब्रीद पूजन आणि सागरिक होणे ही प्रथा महत्वाची आहे. गुरू शिष्य परंपरा जपण्यासाठी हे पूजन महत्वाचे आहे.
पुरोगामी कलगीतुरा समाज मंडळ चिपळूण हे गेली अनेक वर्षे ही परंपरा जपत आहे.
सोमवार दिनांक १७ रोजी नाग पंचमी दिनी ब्रीद पूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मांड भरून पूजा करण्यात आली. अध्यक्ष महादेव नाचरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.या वेळी मंडळाचे पदाधिकारी राजेंद्र पवार, रघुनाथ मेस्त्री, सुरेश बहुतुले, दीपक कांबळी, सुरेश गोलमडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Comments
Post a Comment