ओबीसी प्रबोधनात्मक काव्य स्पर्धेत अशोक बोले प्रथम विजेते

ओबीसी संघर्ष समिती चिपळूण यांचा उपक्रम


चिपळूण  : ओबीसी संघर्ष समिती, चिपळूणच्या वतीने समता, बंधुभाव आणि सामाजिक प्रबोधनाचा संदेश देण्यासाठी नुकतीच 'ओबीसी प्रबोधनात्मक काव्य स्पर्धा'  पार पडली. या स्पर्धेवर संगमेश्वर येथील कवी अशोक बोले यांनी प्रथम क्रमांक पटकावत आपले नाव कोरले.

चिपळूण शहरातील रमाई माता सभागृहात ओबीसी प्रबोधनात्मक काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ओबीसी  समाजात मनोरंजनातून प्रबोधन करण्यासाठी आणि जनजागृती व्हावी, यासाठी ओबीसी काव्य समितीने घेतली होती.कोकणातील विविध भागांतून आलेल्या कवींनी आपल्या ओजस्वी आणि प्रबोधनपर कविता सादर करत उपस्थितांची मने जिंकली. समाज जागृतीच्या दृष्टीने आयोजित या साहित्यिक उपक्रमाला रसिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक अशोक बोले संगमेश्वर, द्वितीय रमेश बोरकर दापोली, तृतीय क्रमांक मालवी होरंबे रत्नागिरी, यांनी पारितोषिक पटकावले. या स्पर्धेत उत्तेजनार्थ प्रा. संदीप येल्ये आणि श्रुती फुटक रत्नागिरी तर सहभाग म्हणून ॲड संतोष भाई कुळे व विलास डिके यांना सन्मानित करण्यात आले. विजेत्यांना रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. 

​या कार्यक्रमाला प्रमुख  म्हणून ओबीसी संघर्ष समिती कोषाध्यक्ष प्रकाश साळवी, सल्लागार महादेव चव्हाण, रामचंद्र पालकर, वासुदेव मेस्त्री, सुरेश जाधव उपस्थित होते. यांनी आपल्या मनोगतातून ओबीसी समाजाने आता आक्रमक होऊन आपल्या हक्कांसाठी लढले पाहिजे असे सांगितले.

स्पर्धेत सर्व कवीने दर्जेदार कविता सादर केल्या. यातून उपस्थितांना नवी प्रेरणा मिळाली. या कार्यक्रमाला कृष्णा कोकमकर, विजय शिगवण, प्रदीप उदेग, भरत धुलप, नितेश खाडे, दीपक मोरे, अमोल कोदारे, श्री. शिरकर, श्री. गोताड, श्री. भोसले, सौ कल्याणी कोकमकर, तुषार कोकमकर,  आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण प्रा. प्रदीप मोहिते व रामचंद्र पालकर यांनी केले.

या संपूर्ण स्पर्धेचे नियोजन आणि सूत्रसंचालन समितीचे सचिव ॲड संतोष भाई कुळे यांनी केले. 

​


Comments