चिवेली वरची शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप...
चिपळूण : एकता प्रतिष्ठान पोसरे आयोजित , चिवेली वरची शाळेत सर्व मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये स्कूल बॅग, छत्री, वह्या, रंगपेटी चित्रकला वही, लेखन साहित्य इत्यादी शाळेपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. माझ्या दहा वर्षाच्या कारकिर्दीत प्रथमताच असे शैक्षणिक किट विद्यार्थ्यांना प्राप्त होत आहे ,याचा मनस्वी आनंद आहे अशा शब्दात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ . पुर्वा कुबडे यांनी आनंद व्यक्त केला. हे सर्व साहित्य उपलब्ध करून देण्यात शाळेमध्ये नुकतेच रुजू झालेले पदवीधर शिक्षक श्री विनोद जानू हुंबरे यांच्या प्रयत्नांचे यश आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
हे साहित्य वाटप करण्यासाठी एकता प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री सुभाष आदवडे , उपाध्यक्ष श्री दिलीप आदवडे, संस्थेचे सचिव एडवोकेट श्री विजय हुंबरे, मुंबई मंडळाचे अध्यक्ष, प्रमुख सल्लागार श्री सूर्यकांतजी तांदळे, खजिनदार श्री रवींद्र करंजकर, कार्याध्यक्ष श्री विनोद हुंबरे आणि युवा कार्यकर्ते श्री प्रमोद आदवडे त्याचबरोबर शाळेच्या व्यवस्थापन अध्यक्ष सौ.श्रावणी घाणेकर अंगणवाडी मदतनीस श्रीमती कांचन कदम, पोषण आहार शिकविणाऱ्या सौ.मानसी सुतार उपस्थित होत्या. या शाळेबरोबरच चिवेली जाडे व चिवली विठेवाडी ,तसेच अंगणवाडी विद्यार्थी यांना सुद्धा शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
हुशार व चुनचुणीत मुलांचे स्वागत गीत ऐकून पदाधिकाऱ्याने खूपच आनंदमय भावना व्यक्त केल्या. गरजेच्या वस्तू मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसांडून वाहत होता. सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांचे शाळेच्या वतीने पदवीधर शिक्षक श्री विनोद हुंबरे यांनी आभार मानले .

Comments
Post a Comment