कोंढे गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी प्रवीण साबळे
चिपळूण : महात्मा गांधी तंटामुक्त समिती कोंढे या समितीच्या अध्यक्ष पदी प्रवीण साबळे यांची निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
तालुक्यातील कोंढे गाव हे गुहागर महामार्गावर वसलेले गाव आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या एक प्रगतशील गाव आहे. सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणून या गावाकडे पाहिले जाते. अशाच गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी प्रवीण साबळे यांची निवड झाली आहे.
प्रवीण साबळे हे जनसामान्यात मिसळणारे आणि सुस्वभावी असे व्यक्तिमत्व आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व आहे. त्यामुळे कोंढे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी त्यांची झालेली निवड नक्कीच योग्य आहे.
त्यांच्या निवडीबद्दल वसिम खान,प्रशांत लोलम, राजेश लोलम, संतोष लोलम, सौरभ लोलम, लियाकत कोलथरकर
विलास साबळे, अनिल चव्हाण, रमेश तावडे, समिर साबळे, अशोक साबळे, शशिकांत वाघे आणि सर्व ग्रामस्थानी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments
Post a Comment