पोसरे येथील सामाजिक कार्यकर्ते अविनाश आदावडे यांना मातृशोक
सुनीता आदावडे यांचे निधन
चिपळूण : तालुक्यातील पोसरे गावचे सामाजिक कार्यकर्ते अविनाश आदावडे यांच्या मातोश्री सुनीता आत्माराम आदावडे यांचे सोमवार दिनांक ७ रोजी दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्या ८० वर्षाच्या होत्या.
सुनीता आदावडे काही दिवस आजारी होत्या. त्यांच्या आजारपणात त्यांचा मुलगा अविनाश आणि सून यांनी उत्तम सेवा केली. मात्र, शेवटी नियतीने डाव साधला आणि त्याचे निधन झाले. त्या अतिशय कष्टाळू होत्या. लग्न झाल्यापासून त्यांनी खूप मेहनत घेत संसाराचा गाढा चालविला होता. त्यांचा मनमिळावू स्वभाव असल्याने सर्वांशी त्यांचे आपुलकीचे संबंध होते. सोमवारी ७ सप्टेंबर रोजी त्यांचे निधन झाले आणि दिनांक ८ रोजी त्याच्यावरती अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

Comments
Post a Comment